नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक खुश खबर - ही कंपनी देणार 4,000 नोकऱ्या

नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक खुश खबर - ही कंपनी देणार 4,000 नोकऱ्या

पुढील्या तीन महिन्यात किमान 4,000 पदवीधर फ्रेशर्सना नोकऱ्या देणार असल्याचे संकेत टेक महिंद्रा ने रविवारी दिलेत. यापुढे नियुक्त्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे असल्याचे टेक महिंद्राचे मुख्य वित्तीय अधिकारी मनोज भट यांनी स्पष्ट केलेय.

  • Share this:

मुंबई, 11 ऑगस्ट : पुढील्या तीन महिन्यात किमान 4,000 पदवीधर फ्रेशर्सना नोकऱ्या देणार असल्याचे संकेत टेक महिंद्रा ने रविवारी दिलेत. यापुढे नियुक्त्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे असल्याचे टेक महिंद्राचे मुख्य वित्तीय अधिकारी मनोज भट यांनी स्पष्ट केलेय. कंपनीने या वर्षात 1800 फ्रेशर्सची नियुक्ति केली असल्याचेही त्यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना सांगितले. तुर्तास आपल्याजवळ निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी, येत्या तीन महिन्यांत आम्ही किमान चार हजार नोकऱ्या देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईच्या कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या जून 2018 पर्यंत 1 लाख 13 हजार 552 होती. गेल्या तीन महिन्यांत त्यात आणखी 745 ने वाढ झाली आहे.

पुनरावलोकनांनंतर तीन महिन्यात कंपनीच्यासॉफ्टवेयर विभागात 72462, बीपीओ मध्ये 34,700 आणि सेल्स अँड सपोर्ट मध्ये 6,390 लोग कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या नोकरी सोडून जाण्याच्या प्रवृत्तीबाबत बोलतांना ते म्हणाले की, उत्तम गुण असलेल्यांच्या जाण्याबाबत आम्ही चिंतीत आहोत, पण त्याचा कंपनीच्या कामावर अजिबात प्रभाव पडत नसल्याचे त्यांनी सांगितले.

का सोडत आहेत लाखो भारतीय महिला नोकऱ्या

देशाच्या अलिकडच्या इतिहासात प्रथमच महिला कामगारांचा सहभाग घटला आहे. एवढंच नव्हे तर एकूण मनुष्यबळातही महिलांचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे. सुमारे २० लाख भारतीय महिलांनी २००४-०५ ते २०११-१२ या काळात नोकऱ्या सोडल्या आहेत. महिलांचा श्रमिक सहभाग दरही घटला आहे. जो दर १९९३-९४ मध्ये ४२ टक्के होता तो २०११-१२ मध्ये ३१ टक्क्यांवर आला. त्यात ५३ टक्के एवढं मोठं प्रमाण हे ग्रामीण भागातील १५ ते २४ या वयोगटातील महिलांचं आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या सहभाग दरातही २००४-०५ च्या ४९ टक्क्यांवरून २००९-१० च्या ३७.८ टक्के एवढी घट झाली. २००४-०५ ते २००९-१० या काळात २४ लाख पुरूष कर्मचाऱ्यांची भर पडत असतानाच महिलांचं प्रमाण २१.७ लाखांनी कमी झालं. असं का घडतंय, हे शोधण्यासाठी जागतिक बँकेच्या संशोधकांनी जनगणना आणि नॅशनल सॅम्पल सर्वेमधून मिळालेल्या आकडेवारीचा अभ्यास केला. या अभ्यास गटात लुईस अँड्रेस, बसाब दासगुप्ता, जॉर्ज जोसेफ, विनोज अब्राहम, मारिया कोरिया यांचा समावेश आहे.

'ती' स्फोटकं मराठा आंदोलनात घातपातासाठीच होती-जितेंद्र आव्हाड

या दिग्गजांनीही बसवले वाहतुकीचे नियम धाब्यावर, दंड भरला नाही

आदिवासी विभागावर 2 लाख कोटींच्या आरक्षण घोटाळ्याचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2018 07:42 PM IST

ताज्या बातम्या