Home /News /national /

COVID-19: सरकारच्या एका निर्णयामुळे 38 हजार लोकांचा वाचला जीव, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा दावा

COVID-19: सरकारच्या एका निर्णयामुळे 38 हजार लोकांचा वाचला जीव, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा दावा

'सरकारने उपाययोजना केल्यामुळे किमान 29 लाख लोकांना लागण होण्यापासून वाचविण्यात यश मिळालं.'

    नवी दिल्ली 14 सप्टेंबर: देशात कोरोना रुग्णांची (COVID-19 Patient) संख्या वाढत आहे. दररोज देशात 90 हजारांच्या आसपास नवे रुग्ण आढळून येत आहे. तर भारत आता जगात दुसऱ्या क्रमांकाचा कोरोनाबाधित देश झालाय. रुग्ण संख्या वाढत असल्याने केंद्र सरकारच्या धोरणांवरही टीका केली जात आहे. लॉकडाऊनचा (Lockdown) काहीही फायदा झाला नाही असंही मत व्यक्त केलं जात आहे. या सगळ्या आरोपांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Harsh Vardhan)  यांनी उत्तर दिलंय. लॉकडाऊनचा निर्णय घेतला नसता तर आणखी 37-38 हजार जणांचा जीव गेला असता असं मत त्यांनी व्यक्त केलं. लोकसभेत माहिती देतांना त्यांनी हा दावा केला. हर्षवर्धन म्हणाले, सरकारने उपाययोजना केल्यामुळे किमान 29 लाख लोकांना लागण होण्यापासून वाचविण्यात यश मिळालं. तर किमान 38 हजार लोकांचा जीव वाचला. देशात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, तेलंगाना, ओडिशा, आसाम, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये देशात सर्वात जास्त कोरोनाचं संक्रमण झालं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या