मराठी बातम्या /बातम्या /देश /भयानक! क्लासहून परतणाऱ्या मुलीवर गँग रेप; नराधमांनी तिला जिवंत जाळायचाही केला प्रयत्न

भयानक! क्लासहून परतणाऱ्या मुलीवर गँग रेप; नराधमांनी तिला जिवंत जाळायचाही केला प्रयत्न

कोरोनाच्या काळातही महिलांवरील अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाहीत. अशीच एक भयंकर घटना इंदोरमध्ये घडली आहे.

कोरोनाच्या काळातही महिलांवरील अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाहीत. अशीच एक भयंकर घटना इंदोरमध्ये घडली आहे.

कोरोनाच्या काळातही महिलांवरील अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाहीत. अशीच एक भयंकर घटना इंदोरमध्ये घडली आहे.

इंदोर, 22 जानेवारी : रात्री 9 च्या सुमारास क्लासमधून परत येणाऱ्या 18 वर्षांच्या मुलीवर पाच जणांनी बलात्कार केल्याची भयंकर घटना सांस्कृतिक शहर म्हणवणाऱ्या मध्य प्रदेशातल्या इंदोरमध्ये घडली आहे. बलात्कार करून हे नराधम थांबले नाहीत, तर तिला नंतर जिवंत जाळण्याचा प्रयत्नही झाला. मात्र आरोपींना या प्रयत्नात यश आलं नाही.

इंदोर इथल्या पोलिसांच्या सांगण्यानुसार, पीडिता (victim) आपला क्लास संपवून घरी परतत होती. रात्री नऊ वाजता तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपींनी बलात्कार केल्यानंतर पीडितेला चाकूनं (knife) मारलं. नंतर रॉकेल टाकलं आणि जाळण्याचा प्रयत्न केला. मुलीने मदतीसाठी आरडा ओरडा केल्यावर तिथे काही लोक आले. यांना भिऊन आरोपी तिथून पळून गेले.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, इंदोरच्या भागीरथपुरामध्ये रेल्वे ट्रॅकजवळ (railway track) दोन मुलांनी आधी पीडितेवर जबरदस्ती केली. त्यानंतर अजून तीन मुलं आली आणि त्यांनी सामूहिक बलात्कार केला.

मुलीला आता शहरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. इथे तिची अवस्था सध्या धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जातं आहे. याप्रकरणात पोलिसांनी सध्या एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. इतर आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

इंदोरच्या पोलिसांनी या याप्रकरणात आता पीडितेचा जबाब नोंदवला आहे. सोबतच केसचा तपासही सुरू केला आहे. मागच्या काही काळात सतत अशा घटना समोर आल्या आहेत. त्यातून सामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थताही वाढली आहे.

First published:

Tags: Gang Rape