Elec-widget

विद्यार्थिनीला काढायला लावले अंतर्वस्त्र;नीट परीक्षेत नियमांचा अतिरेक

विद्यार्थिनीला काढायला लावले अंतर्वस्त्र;नीट परीक्षेत नियमांचा अतिरेक

मेटल हूक असल्याने तिला अंगवस्त्र काढायला सांगण्यात आले. त्यानंतर ती परीक्षेला बसल्यावर पर्यवेक्षक तिच्याकडे अत्यंत अश्लील नजरेने पाहत होता

  • Share this:

10 मे: रविवारी मेडिकलच्या पात्रतेसाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेसाठी नियमांच्या नावाखाली विद्यार्थिनीला तिचे वक्षस्थळावरचे अंतर्वस्त्र काढायला लावल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.  एवढंच नाही तर पर्यवेक्षक तिच्याकडे पूर्णवेळ चुकीच्या नजरेने पाहत  असल्याने तिला परीक्षाही देता आली नाही.

केरळातील कोपा इथे ही घटना घडलीय. मेटल हूक  असल्याने तिला अंगवस्त्र काढायला सांगण्यात आले. त्यानंतर ती परीक्षेला बसल्यावर  पर्यवेक्षक तिच्याकडे अत्यंत अश्लील नजरेने पाहत होता.त्यामुळे  तिला परीक्षा देताना खूप त्रास झाला. अखेर परीक्षा झाल्यानंतर दोन दिवसांत तिने  पर्यवेक्षकाविरूद्ध खटला दाखल केला आहे. 'मी परीक्षा देत असताना तो माझ्या जवळ येऊन उभा राहिला. तो पूर्णवेळ माझ्या  छातीकडे  पाहत होता. त्याला शिक्षा झालीच पाहिजे'

याप्रकरणी तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर अशी घटना घडल्याची तक्रार आमच्याकडे आली नाही असं स्पष्टीकरण सीबीएससीने दिलं  आहे. एकीकडे मुलींच्या  रक्षणासाठी प्रगतीसाठी   त्यांनी शिकावं असे धडे दिले जातात. तर दुसरीकडे त्याच विद्येच्या मंदिरांमध्ये अशा घटना घडत असतील तर स्त्रीसुरक्षेचा प्रश्न किती गंभीर आहे  हे लक्षात आल्यावाचून राहत नाही.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2018 08:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...