मराठी बातम्या /बातम्या /देश /

धक्कादायक! प्रेमाचं रहस्य लपवण्यासाठी मुलीनं प्रियकरासोबत उचललं हे भयानक पाऊल

धक्कादायक! प्रेमाचं रहस्य लपवण्यासाठी मुलीनं प्रियकरासोबत उचललं हे भयानक पाऊल

प्रेमसंबंधातून अनेकदा टोकाची हिंसा घडताना आपण पाहतो. दिल्लीजवळ एका ठिकाणी असाच प्रकार समोर आला आहे.

प्रेमसंबंधातून अनेकदा टोकाची हिंसा घडताना आपण पाहतो. दिल्लीजवळ एका ठिकाणी असाच प्रकार समोर आला आहे.

प्रेमसंबंधातून अनेकदा टोकाची हिंसा घडताना आपण पाहतो. दिल्लीजवळ एका ठिकाणी असाच प्रकार समोर आला आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 26 जानेवारी : दिल्लीपासून 60 किलोमीटर दूर पलवल इथं एका मुलीनं आपलं रहस्य (secret) उघड होऊ नये यासाठी भयानक कृत्य केलं. या मुलीनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत (boyfriend) कट रचत आपल्याच मैत्रिणीचा (friend) जीव घेतला (murdered). पोलिसांनी (police) या मुलीला अटक केली आहे. आता फरार असलेल्या प्रियकराचा शोध सुरू आहे.

खरंतर या मुलीला ही भीती होती, की हा मुलगा आणि तिच्या प्रेमाबाबत ही मैत्रीण घरी किंवा इतर कुठं वाच्यता करेल. या भितीतूनच तिनं आपल्याच मैत्रिणीचा प्रियकराच्या मदतीनं जीव घेतला. तिचं प्रेतसुद्धा आग्रा कॅनॉलच्या (Agra canal) जवळच्या झाडीत फेकून हे दोघे पसार झाले.

पोलिसांनी सध्या आरोपींविरुद्ध हत्या आणि इतर कलमांतर्गत केस दाखल केली आहे. आरोपी मुलीला अटकही केली आहे. आता पोलीस आरोपी प्रियकराच्या शोधात गुंतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीव गमावलेल्या मुलीचं नाव ऋतू आहे. बीएससी फायनल इयरच्या या विद्यार्थिनीला हे अजिबात वाटलं नव्हतं, की आपली मैत्रीणच आपला जीव घेईल.

ऋतूची मैत्रीण ज्योती हिनं आपला प्रियकर पवनसोबत कट रचत ऋतूची हत्या केली. तिचा गळा दाबून जीव घेतला गेला. ऋतूचे वडील रमेशचंद यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रारीत म्हटलं, की त्यांची मोठी मुलगी ऋतू बीएससीच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. ती गुरुवारी सकाळी नऊ वाजता मैत्रिण ज्योती हिच्यासह कॉलेजला गेली होती.

घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी सांगितलं, की पवन प्रजापत आणि ज्योतीविरुद्ध केस दाखल केली असून आता पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: Murder news, Police