मराठी बातम्या /बातम्या /देश /

कलेक्टर साहेबांनी चालवली कचऱ्याची गाडी; VIDEO पाहून नागरिकांनी केलं कौतुक

कलेक्टर साहेबांनी चालवली कचऱ्याची गाडी; VIDEO पाहून नागरिकांनी केलं कौतुक

मोठे अधिकारी असूनही कलेक्टरांनी सर्वांसोबत एकत्र येऊन स्वच्छता अभियानात पुढाकार घेतला.

मोठे अधिकारी असूनही कलेक्टरांनी सर्वांसोबत एकत्र येऊन स्वच्छता अभियानात पुढाकार घेतला.

मोठे अधिकारी असूनही कलेक्टरांनी सर्वांसोबत एकत्र येऊन स्वच्छता अभियानात पुढाकार घेतला.

  • Published by:  Meenal Gangurde
शोपुर, 24 जानेवारी : कलेक्टर कार्यालय आणि परिसरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मिळून स्वच्छता अभियान चालवल्याची चांगली वार्ता समोर आली आहे. कलेक्टर फ्रंट रोडवरील सफाई केल्यानंतर कचरा एकत्र करण्यात आला. विशेष म्हणजे नगर पालिकेचं कचरा गाडी स्वत: कलेक्टर राकेश कुमार श्रीवास्तव यांनी चालवली आणि कचरा फेकला. कलेक्टर कार्यालयाच्या परिसरात दररोज सफाई केल्यानंतर कचरा एकत्र केला जातो. सोबतच कलेक्टर कार्यालयाच्या परिसरात लहान लहान गवत आले होते. ते पाहता रविवारी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मिळून साफसफाईचं काम हाती घेतलं. सोबतच या विशेष अभियानाअंतर्गत कलेक्ट्रेक कॅम्पस स्थित कार्यालयातील अधिकारी ड्युटीवर होते. हे ही वाचा-देशातील पहिला Garbage Cafe; प्लास्टिक आणा आणि मोफत करा ब्रेकफास्ट, लंच..डिनर याशिवाय सफाई अभियानाअंतर्गत नगर पालिका अधिकारी-कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं. या परिसरात जेसीबीच्या माध्यमातून इतरत्र उगवलेली झाडे कापण्यात आली आणि नाले स्वच्छ करण्यात आले. सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी एकत्र आल्यामुळे स्वच्छतेचं काम व्यवस्थित पार पडलं. यावर कलेक्टर म्हणाले की, शहरातील 9 वॉर्डात साफसफाई करण्यात आली आहे. या वॉर्डांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी जागा आहे. येथे 30 जानेवारीनंतर सहकार्याने स्वच्छतेचं काम सुरू करण्यात येईल. यासंदर्भातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये कलेक्टर कचऱ्याची गाडी चालवताना दिसत आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे कलेक्टर कार्यालयातील परिसर स्वच्छ झाला आहे.
First published:

पुढील बातम्या