GSTमध्ये होणार मोठा बदल, अरुण जेटलींनी दिले संकेत!

GSTमध्ये होणार मोठा बदल, अरुण जेटलींनी दिले संकेत!

'जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी टॅक्स दिला पाहिजे. त्यामुळंच देशच्या विकासासाठी पैसा उपलब्ध होईल. टॅक्सचं प्रमाण वाढलं तरच GST एकाच टप्प्यात आणता येईल.'

  • Share this:

नवी दिल्ली, 25 डिसेंबर : लोकसभेच्या निवडणुकांना फक्त आता पाच महिने राहिले आहेत. त्यामुळं सर्व अडचणींच्या प्रश्नांवर मार्ग काढण्याच्या प्रयत्नांना केंद्र सरकारने वेग दिलाय. GST च्या रचेनेवरून व्यापाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी असल्याने भविष्यात एकच दर राहील असे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. केंद्राने नुकतच 28 टक्क्यांमधून बहुतांश वस्तु वगळल्या होत्या. आता सीमेंट, महागड्या कार्स अशा काही मोजक्या वस्तू वगळता इतर सर्व वस्तू 12 आणि 18 टक्क्यांच्या टप्प्यात आणल्या गेल्या आहेत.

जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी टॅक्स दिला पाहिजे. त्यामुळंच देशच्या विकासासाठी पैसा उपलब्ध होईल. टॅक्सचं प्रमाण वाढलं तरच GST एकाच टप्प्यात आणता येईल असंही जेटली यांनी स्पष्ट केलं. ज्या देशात GST आहे तिथे एकच कर आकारला जातो. त्यामुळे भारतातही तशाच प्रकारची कर आकारणी व्हावी अशी मागणी होत होती. मात्र मसर्डिज कार आणि मीठ यांच्यावर एकच कर लावला जाऊ शकत नाही असा युक्तिवाद सरकारने केला होता.

33 वस्तूंवरचा कर कमी

जीएसटी काऊंसिलच्या नुकत्यात झालेल्या बैठकीत एकूण 33 वस्तूंवरचा जीएसटी कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जीएसटीचे नवे दर हे 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. हे दर कमी झाल्यामुळे तिजोरीवर 5500 कोटींची बोझा पडणार आहे.

जीएसटी काऊंसिलच्या बैठकीमध्ये 28 टक्के जीएसटी असलेल्या वस्तूवर कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूण 6 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी होता तो आता 18 टक्के असणार आहे. त्यामुळे आता 28 टक्के जीएसटी असलेल्या 34 वस्तू उरल्या आहेत.

सिनेमाचं तिकिटावरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. यापुढे 100 रूपयांपर्यंतच्या सिनेमा तिकिटांवर जीएसटी 12 टक्के तर 100 रूपयांपेक्षा जास्त तिकिटांवर 18 टक्के जीएसटी लागणार आहे. तसंच प्रवास यात्रेवरील जीएसटी 5 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 32 इंची एलईडी टीव्हीवर 28 टक्क जीएसटी आता कमी करण्यात आला आहे.

त्यामुळे यापुढे 32 इंचाच्या टीव्ही खरेदीवर 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे.त्याचबरोबर टायर, VCR, लिथियम बॅटरीवरील 28 टक्के जीएसटीवरुन 18 टक्के करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने एकूण 33 वस्तूंवर जीएसटी कमी करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु, सिमेंट आणि लक्झरी वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम राहणार आहे.

महाराष्ट्र आणि बंगालमध्ये जीएसटीची चांगली वसुली झाली. मागील वर्षी 8 महिन्यात 48,000 कोटी भरपाई देण्यात आली अशी माहितीही जेटली यांनी दिली. पुढील जीएसटी कांऊसिलची बैठक ही 1 जानेवारी 2019 रोजी होणार आहे. या बैठकीमध्ये बांधकाम व्यवसायसंबंधी चर्चा होणार आहे.बांधकाम व्यवसायामध्ये जीएसटी कमी करण्याचे संकेत अरुण जेटली यांनी दिले आहे.

VIDEO : विदर्भाचा बाला रफिक शेख ठरला 'महाराष्ट्र केसरी'चा मानकरी

First published: December 24, 2018, 2:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading