मराठी बातम्या /बातम्या /देश /आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, लग्नाला गर्दी जमवल्याबद्दल तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड

आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, लग्नाला गर्दी जमवल्याबद्दल तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड

कोरोनाबाबतचे निर्बंध झुगारून देत लग्नाला गर्दी जमवणं चांगलंच महागात पडलंय. नियमांचं उल्लंघन करत 1 हजारांपेक्षा अधिक लोक लग्नाला एकत्र आल्याचं सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी लग्नमालकावर कारवाई करत तब्बल 9 लाख 50 हजारांचा दंड वसूल केला आहे.

पुढे वाचा ...

रायपूर, 7 जुलै : कोरोनाबाबतचे निर्बंध (Corona Guidelines and Rules) झुगारून देत लग्नाला गर्दी जमवणं चांगलंच महागात पडलंय. नियमांचं उल्लंघन करत 1 हजारांपेक्षा अधिक लोक लग्नाला एकत्र आल्याचं सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी लग्नमालकावर कारवाई करत तब्बल 9 लाख 50 हजारांचा (9.5 lakh fine) दंड वसूल केला आहे. आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी कारवाई (Biggest action so far) मानली जात आहे.

छत्तीसगडमधील अंबिकापूर परिसरात एका लग्नासाठी 1 हजारांपेक्षा अधिक वऱ्हाडी मंडळी एकत्र जमली होती. ही बाब समजताच जिल्हाधिकारी संजीव कुमार झा यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आणि लग्नमालकाकडून साडेनऊ लाख रुपयांचा दंड जिल्हा परिषदने वसूल केला. सुरुवातीला दंड देण्यास नकार देणाऱ्या वऱ्हाडींना पोलिसांनी नियमांची आणि संभाव्य शिक्षेची आठवण करून देताच वऱ्हाडींनी आपली चूक कबूल करत दंड भरण्याची तयारी दाखवली.

कोरोना काळातील नियम

भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी अद्याप कोरोनाचा प्रभाव कायम आहे. भविष्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंधांचं पालन सक्तीचं केलं आहे. लग्नसाठी जास्तीत जास्त 50 माणसांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे. काही ठिकाणी याचं माफक प्रमाणात उल्लंघन होत असल्याच्या घटना वारंवार दिसून येतात. मात्र अंबिकापूरमधील कुटुंबानं कळसच केला. मर्यादा 50 ची असताना तब्बल 1 हजार नागरिकांना एकत्र करण्याचा त्यांचा निर्णय चांगलाच महागात पडला.

हे वाचा - उद्योगपती गुपचूप करत होता दुसरं लग्न, मांडवात पहिली पत्नी आली आणि...

इतरांना जरब

वास्तविक, एखादा गुन्हा इतरांनी करू नये, कायद्याची जरब बसावी यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात येते. नियमांचा भंग केल्यास दंडापोटी आपल्याला अव्वाच्या सव्वा रक्कम भरावी लागू शकते, याची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी, हा यामागचा उद्देश असल्याचं प्रशासनातील अधिकारी सांगतात. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जातेय. यातून तरी देशातील नागरिक धडा घेतील आणि कोरोना काळातील बेजबाबदार वर्तन टाळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Marriage