भयंकर!, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन

'रोगापेक्षा इलाज भयंकर' कशाला म्हणतात याचा प्रत्यय दिल्लीतील शासकीय रुग्णालयात आलाय.

Sachin Salve | Updated On: Apr 25, 2018 04:27 PM IST

भयंकर!, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन

दिल्ली, 23 एप्रिल : 'रोगापेक्षा इलाज भयंकर' कशाला म्हणतात याचा प्रत्यय दिल्लीतील शासकीय रुग्णालयात आलाय. एका रुग्णाच्या डोक्याला दुखापत झाली पण त्याच्या पायाचं आॅपरेशन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

दिल्लीत सिव्हिल लाईन भागातील सुश्रुत ट्राॅमा सेंटरमध्ये अपघातात चेहरा आणि डोक्याला दुखापत झाल्यामुळे विजेंद्र नावाचा व्यक्ती दाखल झाला. याच रुग्णालयात आणखी एका रुग्णावर डोक्यावर उपचार सुरू होते. तर आणखी एका रुग्णावर पायावर आॅपरेशन होणार होते. मग काय डाॅक्टरांनी विजेंद्र यांना आॅपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि पायावर आॅपरेशन करून टाकलं. डाॅक्टरांनी विजेंद्र यांच्या डाव्या पायावर स्टीलची पिन टाकण्यासाठी भोक पाडले. पण नंतर हा तो रुग्ण नाही हे लक्षात आल्यावर पिन काढून टाकली.

घडलेले प्रकार हा चुकून घडलाय. विजेंद्र यांना गुंगीचं औषध दिल्यामुळे त्यांनाही याबाबत कळले नाही. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून संबंधी निवासी डाॅक्टरावर कारवाई केली जाईल अशी माहिती वरिष्ठ डाॅक्टर अजय बहाल यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2018 09:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close