एन्काउंटरच्या एकादिवसाआधी विकास दुबेचा 'तो' VIDEO आला समोर

एन्काउंटरच्या एकादिवसाआधी विकास दुबेचा 'तो' VIDEO आला समोर

पोलिसांची नजर चुकवून उज्जैनी इथल्या महाकल मंदिरात आला होता.

  • Share this:

उज्जैनी, 10 जुलै: पोलिसांना चकवा देऊन पळालेला गँगस्टर विकास दुबे उत्तर प्रदेश पोलिसांची नजर चुकवून उज्जैनी इथल्या महाकल मंदिरात आला होता. कानपूरमध्ये 8 पोलिसांची हत्या करून मोकाट फिरणाऱ्या विकास दुबेचा मंदिरातील व्हिडीओ समोर आला आहे.

विकास दुबेला मंदिराबाहेरील एका गार्डनं ओळखलं आणि पोलिसांना माहिती दिली. मध्य प्रदेश पोलिसांनी तात्काळ कारवाई करून विकास दुबेच्या मंदिरातून मुस्क्या आवळल्या. त्यानंतर संध्याकाळी चौकशी करण्यात आली आणि कानपूर पोलिसांच्या हवाली करण्यासाठी त्याला उत्तर प्रदेशात आणण्यात येत असताना पोलिसांच्या ताफ्यामधील गाडीला अपघात झाला.

हे वाचा-सर्वात मोठी बातमी! पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबे एन्काउंटरमध्ये ठार

या अपघातचा फायदा घेऊन कारमध्ये बसलेला विकास दुबे पोलिसांची बंदुक घेऊन फरार झाला. दुबेला शोधण्याची मोहीम सुरू झाली असताना त्यानं गोळीबार सुरू केला. पोलिसांनी सरेंडर करण्याचा सूचना देऊनही त्याचा गोळीबार सुरू होता. या गोळीबाराला पोलिसांकडून प्रत्युत्तर देत असताना विकास दुबे चकमकीत ठार झाला आहे.

हे वाचा-गँगस्टर विकास दुबेच्या 'त्या' काळ्या बॅगमध्ये दडलंय राज, होऊ शकतो मोठा खुलासा

कानपूरचे एसएसपी दिनेश कुमार पी यांनी सांगितले की, 'मुसळधार पाऊस सुरू होता. लवकर पोहोचण्यासाठी ताफा हा सुसाट निघाला होता. त्याचवेळी रस्त्यावर असलेल्या डिव्हाडरला कारने धडक दिली आणि पलटी झाली. घटनेचा फायदा घेऊन विकास दुबे पोलिसांचे पिस्तुल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पाठीमागून येणाऱ्या पोलिसांच्या ताफ्याने दुबेला शरण येण्यास सांगितले. पण, त्याने ऐकले नाही त्यानंतर झालेल्या चकमकीत तो जखमी झाली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.'

Published by: Kranti Kanetkar
First published: July 10, 2020, 12:43 PM IST

ताज्या बातम्या