VIDEO : भय्यूजी महाराजांचा एक दिवसआधीच व्हिडिओ समोर, 'ती' महिला कोण ?

VIDEO : भय्यूजी महाराजांचा एक दिवसआधीच व्हिडिओ समोर, 'ती' महिला कोण ?

भय्यू महाराज यांना भेटणारी त्या महिलेची ओळख अद्याप होऊ शकलेली नाही. त्यामुळे ती महिला कोण होती हा प्रश्न उपस्थितीत झाला

  • Share this:

इंदूर, 12 जून : आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. आता त्यांच्या आत्महत्येपूर्वीचा एक दिवस आधीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय.

भय्यूजी महाराज हे काल सोमवारी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारात राऊ येथील अपना स्वीट्स नावाच्या रेस्टाॅरेंटमध्ये पोहोचले होते. त्याच्यासोबत दोन व्यक्ती होते. रेस्टाॅरेंटमध्ये बसल्यानंतर काही वेळानंतर एक महिला तिथे येते आणि ती भय्यूजी महाराजांसमोर बसते. या व्हिडिओमध्ये एकूण दोन व्यक्ती आणि एक महिला आहे. व्हिडिओ वरून असे दिसते की ही भेट पूर्वनियोजित होती. आधी भय्यूजी महाराज तिथे पोहोचले आणि नंतर त्या दोन व्यक्तींनी संबंधीत महिलेला तिथे बोलावलं. या भेटीदरम्यान भय्यू महाराज हे एक तास या रेस्टाॅरेंटमध्ये थांबले होते.

'मृत्युंजय महादेवा,तुला शरण आलो', भय्यूजी महाराजांचं शेवटचं टि्वट !

भय्यू महाराज यांना भेटणारी त्या महिलेची ओळख अद्याप होऊ शकलेली नाही. त्यामुळे ती महिला कोण होती हा प्रश्न उपस्थितीत झाला. पोलीस या दृष्टीने तपास करत आहे.

हे आहेत भय्यूजी महाराजांचे शेवटचे शब्द, आता कुटुंबाची जबाबदारी घ्या!

दरम्यान, आज दुपारी 2 च्या सुमारास भय्यू महाराज यांनी राहत्या घरी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी त्यांनी सुसाईट नोट सुद्धा लिहून ठेवली होती. या नोटमध्ये त्यांनी "माझ्या कुटुंबियांचा सांभाळ करा, मला खूप तणाव आहे, त्यामुळे मी निरोप घेतो" असं लिहून जीवनयांत्रा संपवली. जगाला तणावमुक्त राहण्याचा सल्ला देणारे भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे.

======================================================================

हेही वाचा..

आत्महत्येसाठी भय्यूजी महाराजांनी या पिस्तुलाचा केला वापर

महागड्या गाड्या आणि घड्या, भय्यूजी महाराजांची आलिशान लाईफस्टाईल

जिथे सप्तपदी घेतली, तिथेच आयुष्य संपवून टाकलं!

राजकारण्यांचे संकटमोचक, भय्यूजी महाराज!

ठाकरे घराणाच्या तीन पिढ्यांशी भय्यूजी महाराजांची होती जवळीक !

भय्यूजी महाराजांची सुसाईड नोट सापडली, मृत्यूचं गूढ कायम

 

First published: June 12, 2018, 8:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading