10 वर्ष सायकलचे पंक्चर काढत होते हे नेते, आज मिळालं मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद

10 वर्ष सायकलचे पंक्चर काढत होते हे नेते, आज मिळालं मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद

आज आपल्या राजकीय करिअरचं शिखर गाठणाऱ्या खाटिक यांचा जन्म अत्यंत गरीब घरात झाला होता. त्यांच्या वडिलांचं सायकल रिपेअरिंगचं दुकान होतं. शाळेत असताना ते वडिलांना सायकल रिपेअरिंगच्या कामात मदत करायचे.

  • Share this:

नवी दिल्ली,3 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा आज तिसऱ्यांदा विस्तार झाला. या मंत्रिमंडळात काही नवीन चेहरे आहेत. यातच एक टिकमगढचे खासदार वीरेंद्र खाटीक आहेत. राजकारणात येण्यापूर्वी वीरेंद्र खाटीक 10 वर्ष सायकलचे पंक्चर दुरूस्त करण्याचं काम करत होते.

वीरेंद्र खाटीक हे सहाव्यांदा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आले आहेत. आज आपल्या राजकीय करिअरचं शिखर गाठणाऱ्या खाटिक यांचा जन्म अत्यंत गरीब घरात झाला होता. त्यांच्या वडिलांचं सायकल रिपेअरिंगचं दुकान होतं. शाळेत असताना ते वडिलांना सायकल रिपेअरिंगच्या कामात मदत करायचे. पुढे अनेक वर्ष ते एकट्यानेच दुकान सांभाळत होते. पण घरच्या परिस्थितीचा त्यांनी त्यांच्या शिक्षणावर कधीही परिणाम होऊ दिला नाही. सागर विद्यापीठातून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले.

एकेकाळी गरिबीचे चटके सोसलेले खाटीक आजही त्यांचा साध्या राहणीमुळे प्रसिद्ध आहेत. आजही प्रचारसभांना आणि इतर ठिकाणी त्यांच्या 11 वर्ष जुन्या स्कुटरवरच येतात. त्यांच्याकडे स्कॉरपिओ कारही आहे पण तिचा वापर ते फक्त ग्रामीण भागात जाण्यासाठीच करतात.

First Published: Sep 3, 2017 01:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading