Home /News /national /

मिरवणुकीत घुसली गांजा भरलेली कार, पाल्यापाचोळ्याप्रमाणे उडाले लोक; चौघांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

मिरवणुकीत घुसली गांजा भरलेली कार, पाल्यापाचोळ्याप्रमाणे उडाले लोक; चौघांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

विसर्जन मिरवणुकीत गांजा भरलेली (a car full of ganja crushed people in the procession) एक कार घुसल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे.

    रायपूर, 15 ऑक्टोबर : विसर्जन मिरवणुकीत गांजा भरलेली (a car full of ganja crushed people in the procession) एक कार घुसल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. काही नशेबाजांनी गांजानं भरलेली ही कार तुफान वेगात गर्दीत घुसवली आणि गर्दीतील (Many died and injured in the incidence) माणसं अक्षरशः उडून बाजूला पडली. या घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचाणा व्हिडिओ समोर आला असून हा प्रकार कुणाच्याही काळजाचा थरकाप उडवणार आहे. असा झाला अपघात छत्तीसगडमधील जशपूरमध्ये दूर्गेची विसर्जन मिरवणूक सुरू होती. अनेक लोक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पाठिमागून प्रचंड वेगात एक कार आली आणि थेट गर्दीत घुसली. गर्दीतील माणसांना उडवत आणि चिरडत ही कार पुढे गेली. काहीजण या धक्क्यानं लांब उडाले, काहीजण ढकलले गेले तर काहीजण गाडीखाली सापडले. गाडीच्या चाकाखाली सापडलेल्या माणसांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समजते आहे. तुफान वेगात आली कार या कारचा वेग 100 पेक्षाही जास्त असल्याची माहिती आहे. रस्त्याने चालणाऱ्या माणसांच्या अंगावर ही गाडी आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. नागरिकांच्या किंकाळ्या आणि ओरडण्याचे आवाज येऊ लागले. काही समजायच्या आतच लोकांचे प्राण गेले होते. जे वाचले त्यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी कारवर हल्लाबोल करत कारला आग लावली. हे वाचा - मुंबई लोकल संदर्भातली मोठी अपडेट, आता 'या' लोकांनाही प्रवासाची मुभा पोलिसांची कारवाई पोलिसांनी या घटनेतील दोन्ही आरोपींना अटक केली आहे. बबलू विश्वकर्मा (वय 21) आणि शिशुपाल साहू ( वय 26) अशी त्यांची नावं आहेत. दोन्ही आरोपी मध्यप्रदेशातील आहेत. जमावाचा पोलिसांवरच आरोप या घटनेनं रागावलेला जमाव पोलीस ठाण्यात गेला आणि पोलिस ठाण्याला घेराव घालण्यात आला. या गाडीत ड्रग्ज होते, अशी माहिती समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या संगनमतानेच ड्रग्जची तस्करी सुरू असल्याचा आरोप जमावाने केला आणि त्या अधिकाऱ्याला तातडीने अटक करण्याची मागणी केली. जमावाने पोलिसांविरोधात घोषणाही दिल्या. गाडीतील दोघांना जमावाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. अशा आव्हानात्मक परिस्थितीतून पोलिसांनी आरोपींना सोडवलं आणि त्यांना अटक केली. या परिसरात सध्या तणावाचं वातावरण असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Accident, Chattisgarh

    पुढील बातम्या