Home /News /national /

Video : अचानक बसमध्ये स्फोट; वैष्णोदेवी मंदिर बेस कॅम्पहून परतणारे यात्रेकरू आगीत होरपळले, दोघांचा मृत्यू

Video : अचानक बसमध्ये स्फोट; वैष्णोदेवी मंदिर बेस कॅम्पहून परतणारे यात्रेकरू आगीत होरपळले, दोघांचा मृत्यू

या घटनेत 20 यात्रेकरू गंभीर जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

    नवी दिल्ली, 13 मे : माता वैष्णोदेवी मंदिर (Mata Vaishnodevi temple) बेस कॅम्पहून परतणाऱ्या यात्रेकरूंनी भरलेल्या बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. यात दोघांचा मृत्यू झाला असून तब्बल 20 प्रवासी जखमी झाले आहेत. माता वैष्णवदेवी मंदिरातून परतणाऱ्या बसला कटरा येथील शनिदेव मंदिराजवळ आग लागल्याचं सांगितलं जात आहे. काही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की गाडीच्या आत काही संशयास्पद स्फोटानंतर आग लागली. अनेक जण गंभीर भाजले असून, जीवितहानी होण्याची भीती आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा पुढील शोध घेतला जात आहे. बसमध्ये स्फोट होण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तरी या प्रकरणात शोध सुरू आहे. बातमी अपडेट होत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Fire, Himachal pradesh

    पुढील बातम्या