रामेश्वरम् 3 ऑगस्ट: चार धामांपैकी महत्त्वाचं धाम असलेलं रामेश्वरम् (Rameswaram) हे भारताचं शेवटचं टोक समजलं जातं. इथल्या धनुष्यकोडी पासून समुद्रमार्गाने श्रीलंका अगदीच जवळ आहे. सोमवारी दुपारी रामेश्वरच्या नागरिकांना सूर्याचं अनोखं आणि अद्भूत रुप बघायला मिळालं. (Halo around the sun) वातावरणातल्या विशिष्ट बदलामुळे सूर्याभोवती इंद्रधनुष्यासारखं वर्तुळाकार सप्तरंगी वलय दिसतं. त्यालाच इंद्रवज्र असंही म्हणतात. हा प्रकार अतिशय दुर्मिळ असल्याने त्याबाबत फारशी चर्चा नसल्याने इथल्या नागरिकांमध्ये कमालीचं कुतूलह होतं.
श्रावणातल्या सोमवारी रामेश्वरमला कायम गर्दी असते. मात्र कोरोनामुळे या छोट्याश्या नगरात शांतता आहे. दुपारी सूर्याचं हे अनोखं रुप दिसल्याने नेमकं काय होत आहे लोकांना सुरुवातीला कळालच नाही. नंतर मात्र हे इंद्रवज्र असल्याची माहिती सगळ्यांना कळाली.
विज्ञानाचे शिक्षक, खगोलप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला. इंद्रवज्राचे वैशिष्ट्य म्हणजे जो हे दृश्य पाहतो त्याची स्वत:चीच सावली त्याला त्यात दिसते. हे दृश्य पाहणाऱ्याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते. त्यामुळे नागरिकांनाही त्याचा वेगळाच आनंद मिळतो.
महाराष्ट्रात कोकणकड्यांवर 2016मध्ये इंद्रवज्र दिसला होता. एका इंग्रज अधिकाऱ्याने पहिल्यांदा त्याची नोंद करून ठेवली आहे असं सांगितलं जातं.
#Watch Rameswaram: A bright 'Halo' around the sun was spotted in the sky around noon today. Locals enjoyed the spectacle in the sky for more than half an hour. #TamilNadu pic.twitter.com/GtRXwoXVxZ
— ANI (@ANI) August 3, 2020
इंद्रधनुष्य आणि इंद्रवज्र हे एक सारखच असतं मात्र इंद्रधुष्य हे दिसायला पूर्ण वर्तुळाकारात दिसत नाही. ढगांची स्थिती, हवा, हवेतील आद्रता असे अनेक घटक यासाठी अवलंबून असतात. त्या सगळ्यांचा मेळ झाला तरच इंद्रवज्र दिसतं असं अभ्यासक सांगतात.
दऱ्या खोऱ्यांमध्ये भटकणारे पर्यट आणि खगोल अभ्यासकांना या प्रकाराची कमालीची उत्सुकता असते.