मराठी बातम्या /बातम्या /देश /

…अन्यथा मुस्लीम धर्म स्वीकारू, या ब्राह्मण कुटुंबाने दिला थेट पंतप्रधान मोदींना इशारा

…अन्यथा मुस्लीम धर्म स्वीकारू, या ब्राह्मण कुटुंबाने दिला थेट पंतप्रधान मोदींना इशारा

आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची आणि त्रासाची दखल घेतली नाही, तर आपण पूर्ण परिवारासह मुस्लीम धर्म स्वीकारू, अशी धमकीच एका ब्राह्मण समाजातील कुटुंबानं पत्र लिहून दिली आहे.

  • Published by:  desk news

भोपाळ, 13 जुलै : आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची (injustice) आणि त्रासाची दखल घेतली नाही, तर आपण पूर्ण परिवारासह मुस्लीम धर्म (Muslim religion) स्वीकारू, अशी धमकीच एका ब्राह्मण समाजातील कुटुंबानं (Brahmin Family) पत्र लिहून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला (Local police) दिलेल्या पत्रात त्यांनी ही धमकी दिली आहे.

काय आहे तक्रार?

मध्यप्रदेशमधील ग्वालियर शहरात शर्मा कुटुंबीय राहतात. त्यांचं एकत्र कुटुंब असून त्यात 25 सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांसोबत त्यांचे येता-जाता भांडण होते आणि त्या परिवारातील लोक ऍट्रॉसिटी लावू, अशी धमकी सातत्यानं देत असल्याची तक्रार शर्मा यांनी केली आहे. सततच्या या धमकीला आपण वैतागलो आहोत आणि याची सरकारनं वेळीच दखल घेतली नाही, तर धर्मपरिवर्तन करू, अशी तंबीच शर्मांनी या पत्रातून दिली आहे. मुस्लिम समाज आपलं संरक्षण करेल, असा विश्वास वाटत असून रोजरोजच्या धमक्या आणि त्रासातून आपली सुटका होईल, असं आपलं मत असल्याचं त्यांनी या पत्रात लिहिलं आहे.

पोलिसांनी घेतली दखल

या पत्राची राज्यभर चर्चा सुरू होताच पोलिसही हादरले. पोलीस आय़ुक्तांनी शर्मा कुटुंबातील प्रमुखांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं आणि त्यांची विचारपूस केली. या प्रकऱणाचा लवकरच सोक्षमोक्ष लावू आणि विनाकारण कुणी धमकी देत असेल, तर त्याचा बंदोबस्त करू असं आश्वासन पोलिसांनी त्यांना दिल्यानंतर शर्मा यांनी वाट पाहण्याची तयारी दाखवली आहे. ही समस्या सुटली नाही, तर मात्र आपण आपल्या निर्णयावर ठाम असून धर्मपरिवर्तन करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य तयार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हे वाचा -मोठी बातमी: आता मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये सुरू होणार RSS च्या शाखा -सरसंघचालक

शेजाऱ्यांशी होणाऱ्या भांडणावरून थेट पंतप्रधानांना पत्र लिहिल्यामुळे ग्वालियरमध्य शर्मा कुटुंबाची जोरदार चर्चा सुरु आहे. आता पोलिसांनी या प्रकऱणात लक्ष घातल्यामुळे पुढे काय होतं, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

First published:

Tags: Hindu, Madhya pradesh, Muslim