दारू पिताना सिगारेट ओढणे पडले भारी, बाटलीचा झाला भयंकर स्फोट आणि....

दारू पिताना सिगारेट ओढणे पडले भारी, बाटलीचा झाला भयंकर स्फोट आणि....

थंडीचे दिवस असल्यामुळे तिघांनी पुरेशी दारू, सिगारेट आणले होते. एक एक प्याले रिचवत तिघांची जोरदार पार्टी सुरू होती.

  • Share this:

मुरैना, 13 डिसेंबर : थंडीच्या दिवसात तीन मित्रांना एकत्र दारू पार्टी (Alcohol party) करणे चांगलेच महागात पडल्याची घटना समोर आली आहे. दारू पार्टी करत असताना एका चुकीमुळे दारूच्या बाटलीचा अचानक स्फोट झाला आणि तिन्ही मित्र चांगलेच भाजले.

इंडिया शाम तकने दिलेल्या वृतानुसार, मध्य प्रदेशमधील (madhya pradesh) मुरैना जिल्ह्यातील जनकपूर गावात ही घटना घडली आहे. रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास  लायक सिंह (वय 65), हथियार सिंह (वय 70) आणि ब्रजमोहन सिंह (वय 30) हे तिघेही जण दारू पिण्यासाठी एकत्र बसले होते.

शिवा बनून हिंदू तरुणीशी थाटला संसार; 5 वर्षांनंतर धक्कादायक प्रकार आला समोर

थंडीचे दिवस असल्यामुळे तिघांनी पुरेशी दारू, सिगारेट आणले होते. एक एक प्याले रिचवत तिघांची जोरदार पार्टी सुरू होती. मध्येच तिघेही जण सिगारेट सुद्धा ओढत होते. सिगारेट ओढत असताना जळालेला तंबाखूचा भाग जमिनीवर झटकण्याचा प्रयत्न केला असता तो जमिनीवर न पडता थेट दारूच्या बाटलीत पडला.  सिगारेटचा गरम तुकडा थेट दारू बाटलीत पडल्यामुळे आगीचा एकच भडका उडाला आणि बाटलीचा स्फोट झाल. तिघेही जण दारूच्या नशेत तर्राट झालेले असल्यामुळे नेमकं काय घडलं, हे कुणालाच काही कळलं नाही.

कोरोनापाठोपाठ आणखी एका गूढ आजाराचा धुमाकूळ, 600 जणांना बाधा

आगीच्या भडक्यामुळे लायक सिंह, हथियार सिंह आणि ब्रजमोहन सिंह यांचे चेहरे, हात आणि छाती भाजून गेली होती. त्यामुळे तिघांची दारू एका झटक्यात उतरली. तिघांनी अक्षरश: जमिनीवर लोळून आग विझवली होती.  अचानक स्फोटाचा आवाज आल्यामुळे शेजाऱ्यांनी जाऊन पाहिले असता तिघेही भाजलेल्या अवस्थेत आढळून आहे. त्यानंतर तिघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.  तिघांवरही उपचार सुरू आहे. पण, दारूच्या बाटलीमध्ये स्फोट कसा काय झाला, या प्रश्नामुळे गावकरी चांगलेच बुचकळ्यात पडले आहे.

Published by: sachin Salve
First published: December 13, 2020, 5:43 PM IST

ताज्या बातम्या