भोपाळ, 13 जुलै: मध्यप्रदेशची लोकसंख्या (Population of Madhya Pradesh) गेल्या दशकभरात (last decade) सुमारे दीड कोटींनी (1.5 crore) वाढली असून उत्तर प्रदेशप्रमाणे आपल्या राज्यातही लोकसंख्या नियंत्रण कायदा (Population control act) आणावा, अशी मागणी भाजप आमदार रामेश्वर शर्मा (MLA Rameshwar Sharma) यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांना पत्र लिहून त्यांनी लोकसंख्या नियंत्रणाबाबत कडक कायदा करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाले आमदार?
गेल्या 10 ते 12 वर्षांत मध्यप्रदेशची लोकसंख्या 1.5 कोटींनी वाढली आहे. पाश्चिमात्य जगातील काही देशांपेक्षाही मध्यप्रदेशची लोकसंख्या अधिक झाली आहे. 2011 च्या जनणनेनुसार मध्यप्रदेशची लोकसंख्या 7 कोटी 25 लाख होती. ती 2021 मध्ये दीड कोटींनी वाढली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे सांगताना त्यांनी पाश्चिमात्य जगातील काही देशांच्या लोकसंख्येचे आकडेही सादर केले आहेत. जर्मनीची लोकसंख्या 8 कोटी 37 लाख, फ्रान्सची लोकसंख्या 6 कोटी, इंग्लंडची लोकसंख्या 6 कोटी 38 लाख आहे. अनेक देशांची लोकसंख्या ही मध्यप्रदेशपेक्षाही कमी आहे. मात्र त्यांच्याकडे असणाऱ्या पायाभूत सुविधा या राज्याच्या तुलनेत कैक पट अधिक आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशप्रमाणेच कायदा करून लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण स्विकारावे, अशी विनंती आमदार शर्मा यांनी केली आहे.
लोकसंख्या कुणामुळे वाढली?
लोकसंख्या कुठल्या समुदायामुळे वाढली, हे सर्वांनाच माहित आहे, असं म्हणत त्यांनी छोट्या कुटुंबांची गरज अधोरेखित केली आहे. मुलांनी आईवडिलांची कीर्ती वाढेल, असं कर्तृत्व करून दाखवावं, असा सल्लादेखील त्यांनी दिला आहे.
हे वाचा -ना भपका, ना बडेजाव! फक्त 500 रुपयांत झालं लग्न
काय आहे उत्तर प्रदेशचा कायदा
उत्तर प्रदेशनं लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा मसुदा तयार केला असून लवकरच त्याचा कायदा करण्याचा सरकारचा मानस आहे. यामध्ये दोनपेक्षा अधिक अपत्यं असणाऱ्यांना सरकारी नोकरीपासून, सरकारी योजनांपासून आणि स्थानिक निवडणुकांपासून वंचित ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. तर दोन अपत्यं असणाऱ्या पालकांना काही अधिकचे लाभ देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Uttar pardesh