आज भाजपची जंबो बैठक; देशातील सर्व भाजप मंत्र्यांना आमंत्रण

या बैठकीत भाजपची पुढची रणनीती निश्चित होणार आहे.देशभरातील 1300 आमदार आणि 350 खासदारांनासुद्धा विशेष बोलावण्यात आलं आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2017 10:25 AM IST

आज भाजपची जंबो बैठक; देशातील सर्व भाजप मंत्र्यांना आमंत्रण

दिल्ली,24 सप्टेंबर: भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणीची महत्त्वाची बैठक रविवारी आणि सोमवारी दिल्लीत होणार आहे. सोमवारी भाजपचे देशभरतील सगळे मुख्यमंत्री,मंत्री, आमदार आणि खासदारांना बैठकीसाठी विशेष आमंत्रण देण्यात आलं आहे. या बैठकीत भाजपची पुढची रणनीती निश्चित होणार आहे.

भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 350 जागांचे लक्ष ठेवले आहे, पण पक्ष आणि सरकार समोर याक्षणी जी आव्हानं आहेत ते बघता हे लक्ष पूर्ण करण्यासाठी भाजपला विशेष रणनीती आखावी लागणार आहे. रविवारपासून दिल्लीत सुरू होणारी भाजपची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पक्षाची पुढची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

डिसेंबरमध्ये होणाऱ्या गुजरात आणि कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसोबतच 2019 पर्यंतच्या सगळ्याच राज्यांच्या निवडणुका भाजपसाठी जिंकणं महत्वाचं आहे. म्हणूनच सोमवारी भाजपच्या कार्यकारणी बैठकीला भाजपच्या देशभरातील 1300 आमदार आणि 350 खासदारांनासुद्धा विशेष बोलावण्यात आलं आहे. सोशल मीडियात सरकारची बाजू आक्रमकपणे मांडण्याचा कानमंत्र या बैठकीत नेत्यांना दिला जाईल. पक्षाची संघटनात्मक स्थिति आणि सध्यची राजकीय परिस्थिती यावरसुद्धा या बैठकीत चर्चा होणार आहे. नोटाबंदी नंतर आलेले आकडे, जीएसटीमुळे नाराज व्यापारी, यांना कसे मनवायाचे यावर देखील या बैठकीत चर्चा होईल.स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला संबोधणार आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2017 10:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...