मराठी बातम्या /बातम्या /देश /

मुसळधार पावसामुळे पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली 4 मजली इमारत, पाहा VIDEO

मुसळधार पावसामुळे पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली 4 मजली इमारत, पाहा VIDEO

सततच्या पावसामुळे ही इमारत कमकुवत बनली होती. ही इमारत धोकादायक बनली असल्याने तिथून सगळ्यांना सुरक्षीत स्थळी जाण्यास सांगण्यात आलं होतं.

सततच्या पावसामुळे ही इमारत कमकुवत बनली होती. ही इमारत धोकादायक बनली असल्याने तिथून सगळ्यांना सुरक्षीत स्थळी जाण्यास सांगण्यात आलं होतं.

सततच्या पावसामुळे ही इमारत कमकुवत बनली होती. ही इमारत धोकादायक बनली असल्याने तिथून सगळ्यांना सुरक्षीत स्थळी जाण्यास सांगण्यात आलं होतं.

    गंगटोक 12 जुलै: देशातल्या अनेक राज्यांमध्ये दमदार पावसाने जोर धरला आहे. पूर्वेतल्या राज्यांमध्ये लवकर पावसाला सुरुवात होते आणि अतिशय जोरदार पाऊस तिथे कोसळतो. सिक्कीममध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे एक चार मजली इमारत कोसळली आहे. काही क्षणात या इमारतीचा मोठा भाग पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. मंगन इथे ही घटना घडली. सुदैवाने जिवित हानी झाली नाही. सिक्कीममध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस होत आहे. सततच्या पावसामुळे ही इमारत कमकुवत बनली होती. ही इमारत धोकादायक बनली असल्याने तिथून सगळ्यांना सुरक्षीत स्थळी जाण्यास सांगण्यात आलं होतं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. रविवारीही पाऊस सुरूच होता. त्यावेळी सायंकाळी ही इमारत काही क्षणात कोसळली. महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढत आहे. मुंबईत रविवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 24 तासांत मुंबईसह, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. कोल्हापूर, पुणे, सातारा भागात पुढील 24 तासांत काही भागात मुसळधार पाऊस होईल. दरम्यान, मुंबईसह उपनगरात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. काही उपनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मुंबई, नवी मुंबई, कोकण किनारपट्टी, महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. देशातील बहुतांश भागातही पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात गेल्या 8 दिवसांपासून सुरू होत असलेल्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, खडकवासला धरणसाखळीतली चारही धरण भरलेली असल्यामुळे मुठा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. तर दुसरीकडे, कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराजवळून वाहणाऱ्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जगबुडी नदीला पूर आला आहेय नदी धोक्याची पातळीवर दुथडी भरून वाहत आहे. यामुळे नगर पालिका प्रशासन आणि व्यापारी वर्गात चिंतेचं वातवरण पसरलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या