डीगड (पंजाब), 15 मे : देशात कोरोनाने हाहाकार माजला आहे. या संसर्गजन्य रोगामुळे देश लॉकडाऊन होण्याची वेळ आली. अशात रुग्णालयांची कोरोना उपचारामुळे दुरास्था झाली आहे. या सगळ्यात रुग्णालयाच्या कोव्हिड -19 आयसोलेशन वॉर्डमध्ये तीन वर्षाच्या मुलाने अचानक एका पंजाबी गाण्यावर नाचणं सुरू केलं आणि सगळ्यांच्याच चेहऱ्यावर गोड हसू उमटलं.
या मुलाच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मोठ्या संख्येनं लोक हा व्हिडिओ शेअर करत आहेत. खरंतर, महाराष्ट्रातील नांदेड इथल्या गुरुद्वारा हजूर साहिबहून आलेल्या मुलाची 35 वर्षांची आई आणि हा चिमुकला 30 एप्रिलपासून रुग्णालयात आहेत.
पंजाबच्या नवांशहर इथल्या सरकारी रुग्णालयातला हा व्हिडिओ आहे. मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मुलगा पंजाबी गाण्यावर नाचताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये प्रभागातील काही रुग्णांच्या टाळ्या वाजवण्याचा आवाजही ऐकू येत आहे. नवांशहरचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी हरविंदर सिंह म्हणाले की, आम्ही आयसोलेशन वॉर्डमध्ये एक 'म्युझिक सिस्टम' ठेवला आहे आणि गाणं वाजताच मुलाने नाचण्यास सुरुवात केली.
#Nawanshahr#FightAgainstCorona
"ਬੇਪ੍ਰਵਾਹ ਬਚਪਨ"
ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਹਸਪਤਾਲ, ਨਵਾਂ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਆਈਸੋਲੇਸ਼ਨ ਵਾਰਡ ਵਿੱਚ ਆਪਣੀ ਮਾਂ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਕੋਰੋਨਾ ਵਾਇਰਸ ਦਾ ਸਾਹਮਣਾ ਕਰ ਰਿਹਾ ਇਹ ਤਿੰਨ ਸਾਲ ਦਾ ਬੱਚਾ ਸਾਰੇ ਕੋਵਿਡ-19 ਮਰੀਜ਼ਾਂ ਅਤੇ ਹਸਪਤਾਲ ਸਟਾਫ਼ ਦਾ ਮਨ ਮੋਹ ਰਿਹੈ। @capt_amarinder@VinayBublani @kbssidhu1961 pic.twitter.com/xDNgePUW0H
— DPRO SBS Nagar (@dprosbsnagar) May 14, 2020
या आकड्यांनी भरली केंद्र सरकारला धडकी, कोरोनाच्या मोठ्या उद्रेकाची भीती
आयसोलेशन वॉर्डामध्ये भांगडा करणारा रुग्ण
हरविंदरसिंग यांनी सांगितलं की, आयसोलेशन वॉर्डचे आणखी काही रुग्णही तिथे भांगडा करतात. इथे भजनदेखील होतं. त्यांनी सांगितलं की मुलाची आणि त्याची आई दोघांची प्रकृती स्थिर आहे. गुरुवारी त्यांचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सिंह म्हणाले की, नवांशहरमध्ये एकूण 68 रुग्ण दाखल आहेत, त्यापैकी 65 नांदेडहून परत आले आहेत.
खळबळजनक! पाण्याच्या वादावरून पाजलं मूत्र, वैतागून तरुणाने संपवलं आयुष्य