आंध्र प्रदेशच्या गुंटूरमध्ये तीन मजली इमारत कोसळली

आंध्र प्रदेशच्या गुंटूरमध्ये तीन मजली इमारत कोसळली

तीन मजल्यांची ही इमारत काल दुपारी अक्षरशः पत्त्यांच्या ढिगाऱ्यासारखी कोसळली. 12 वर्षांपूर्वी ही इमारत बांधून पूर्ण झाली होती.

  • Share this:

गुंटूर,12 नोव्हेंबर: आंध्र प्रदेशच्या गुंटूरमध्ये काल एक इमारत कोसळली. सुदैव असं की सर्व रहिवासी काही दिवसांपूर्वीच इमारत सोडून गेले होते.त्यामुळे कुठलीच जीवितहानी झाली नाही.

तीन मजल्यांची ही इमारत काल दुपारी अक्षरशः पत्त्यांच्या ढिगाऱ्यासारखी कोसळली. 12 वर्षांपूर्वी ही इमारत बांधून पूर्ण झाली होती. काही महिन्यांपूर्वी इथे रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू झालं होतं. त्याचाच भाग म्हणून ड्रेनेज लाईन नव्यानं खणण्याचं काम सुरू होतं. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ड्रेनेजच्या कामामुळे इमारतीचा पाया कमकुवत झाला होता. गुंटूरच्या मनपा आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत . के.नरसिंहराव यांनी ही इमारत 12 वर्षांपूर्वी बांधली होती.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2017 10:16 AM IST

ताज्या बातम्या