S M L

'या' गावात सापडली 1500 वर्षांपूर्वीची 5 खोल्या असलेली विहीर!

छोट्याश्या गावात ही अशी पुरातन विहीर सापडल्यानं सगळ्या गावकऱ्यांमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.

Sachin Salve | Updated On: Feb 6, 2018 05:27 PM IST

'या' गावात सापडली 1500 वर्षांपूर्वीची 5 खोल्या असलेली विहीर!

06 फेब्रुवारी : हिमाचल प्रेदशच्या हरिपूर गावात 1500 वर्षांपूर्वीची एक विहिर सापडली आहे. या विहिरीचं वैशिष्ट्यं असं की या विहीरीखाली 5 खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये काही एतिहासीक वस्तू सापडण्याची शक्यता आहे. छोट्याश्या गावात ही अशी पुरातन विहीर सापडल्यानं सगळ्या गावकऱ्यांमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.

खरंतर हरिपूर गावात पाण्याची खूप मोठी समस्या आहे. त्यामुळे गावाला पाण्याच्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी इथले आमदार होशियार सिंह यांनी या विहीरीला साफ करण्यास सांगितलं आणि यादरम्यानच 5 खोल्या असणाऱ्या या विहीरीचा शोध लागला.

इथल्या गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार, 'जेव्हा ते या विहीरीला साफ करण्यासाठी आले तेव्हा त्या विहीरीमध्ये पाणी होतं. त्यानंतर त्यांनी स्वच्छता करायला सुरुवात केली. जसजसं त्यांनी पाणी बाहेर काढलं तसतसं एक-एक खोली त्यांनी सापडत गेली.'

याआधी या विहीरीला कधीच साफ करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे त्यामागचे रहस्य लोकांच्या समोर आलं नाही.

या विहीरवर आम्ही संशोधन करू आणि यामागची रहस्य शोधून काढू असं इथल्या आमदारांकडून सांगण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2018 04:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close