मराठी बातम्या /बातम्या /देश /

13 वर्षांच्या मुलाच्या नावावर Wonder book of records; डोळ्यांना पट्टी बांधून दिला अनोखा परफॉर्मन्स

13 वर्षांच्या मुलाच्या नावावर Wonder book of records; डोळ्यांना पट्टी बांधून दिला अनोखा परफॉर्मन्स

ए एस हरिहरन या 13 वर्षांच्या मुलाच्या रेकॉर्डब्रेक परफॉर्मन्सची गोष्ट तुम्हाला तोंडात बोटं घालायला लावेल.

ए एस हरिहरन या 13 वर्षांच्या मुलाच्या रेकॉर्डब्रेक परफॉर्मन्सची गोष्ट तुम्हाला तोंडात बोटं घालायला लावेल.

ए एस हरिहरन या 13 वर्षांच्या मुलाच्या रेकॉर्डब्रेक परफॉर्मन्सची गोष्ट तुम्हाला तोंडात बोटं घालायला लावेल.

  • Published by:  News18 Desk

हैद्राबाद, 10 जानेवारी : कमालीची अवघड गाणी सुरात म्हणणारी लहान-लहान मुलं आपण रिऍलिटी शोजच्या माध्यमातून कायमच पाहत असतो. या मुलांचा परफॉर्मन्स (performance) थक्क करून टाकणारा असतो. मात्र ए एस हरिहरन या 13 वर्षांच्या मुलाच्या रेकॉर्डब्रेक परफॉर्मन्सची गोष्ट तुम्हाला तोंडात बोटं घालायला लावेल.

ए एस हरिहरन नायडू. याचं नाव नुकतंच 'वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये (wonder book of records) लिहिलं गेलं आहे. कारण या मुलानं चक्क डोळ्यांना पट्टी बांधलेल्या अवस्थेत  (blindfold) गाणी कीबोर्डवर वाजवलीत. हैद्राबादच्या (Hyderabad) गीतांजली देवशाला (Gitanjali Devshala) या संस्थेतला हरिहरन विद्यार्थी आहे. त्यानं 'वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स'च्या जजेससमोर परफॉर्मन्स दिला. आणि यशस्वीपणे हा रेकॉर्ड (record) पूर्ण केला. यावेळी तिथं उपस्थित असलेले सगळेच कमालीचे आश्चर्यचकित झाले होते. तब्बल 20 गाणी केवळ 30 मिनिटात, तेसुद्धा डोळे बांधलेल्या अवस्थेत म्हणण्याचं अनोखं रेकॉर्ड यातून हरिहरच्या नावावर दाखल झालं आहे.

IANS अर्थात इंडो एशियन न्यूज सर्व्हिसशी बोलताना 'वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स'चे डॉ. जी. स्वर्ण श्री म्हणाले, 'त्यानं 20 गाणी 30 मिनिटात गायली. आणि तेही डोळ्यांवर पट्टी बांधून. खरंतर 30 मिनिटही नाही, त्यानं ती 29 मिनिट 19 सेकंदातच गायली.' हरिहरनची आई अरुणा तुम्मा यासुद्धा तिथं उपस्थित होत्या. त्यांनाही मुलाचा प्रचंड अभिमान वाटला. त्या म्हणाल्या, 'हरेक मुला-मुलीत काहीतरी सुप्त गुण असतातच. त्यांना योग्य वयात ओळखत पुढे आणणं ही पालकांची (parents) जबाबदारी आहे.'

हरिहरन एक प्रशिक्षित गायक आहे.  नावाजलेल्या संस्थेमधून त्यानं वयाच्या नवव्या वर्षापासूनच गाण्याचं प्रशिक्षण घेतलं. कोरोनामुळं लागलेल्या लॉकडाउनच्या काळातच त्यानं 'चिल विथ हरिहरन' (Chill with Hariharan) हे युट्युब चॅनल (youtube Channel) सुरू केलं. तो सांगतो, '2020 हे तसं एकदम खराब वर्ष होतं. पण या वर्षाच्या शेवटी नक्कीच काही अविस्मरणीय क्षण वाट्याला आले.'

आपल्या चॅनलच्या माध्यमातून हरिहरनने अनेक चांगले व्हिडीओ (video) बनवले आहेत. सुशांत सिंग राजपुतच्या स्मृतींना उजाळा देत श्रद्धांजली वाहणारा व्हिडीओही त्यापैकीच एक. हरिहरनला 3000 सबस्क्रायबर आणि 60 हजार व्ह्यूज मिळाले आहेत.

First published:

Tags: Hyderabad, YouTube Channel