CRPF जवानांच्या कॅम्पमध्ये तब्बल 12 फुटांचा 'कोब्रा'

CRPF जवानांच्या कॅम्पमध्ये तब्बल 12 फुटांचा 'कोब्रा'

दहशतवाद्यांचा सामना करणाऱ्या जवानांना या सापशी कसं लढावं हेच कळत नव्हतं.

  • Share this:

भुवनेश्वर, 12 जून : CRPF जवानांच्या कॅम्पमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि 24 तास सशस्त्र निगरानी असते. जोडीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून देखरेख. त्याचबरोबर जवानही 24 तास दक्ष असतात. अशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून एक पाहुणा या जवानांच्या कॅम्पमध्ये घुसला आणि एकच खबबळ उडाली. दहशतवाद्यांशी झुंझणाऱ्या जवानांनाही यावेळी काय करावे हे सुचत नव्हतं.

त्याचं झालं असं की, बुधवारी रायगडा शेशखाल या भागात असलेल्या CRPF च्या कॅम्पमध्ये दुपारी एकच खबळबळ उडाली. नेमकं काय झालं हे जेव्हा कळालं तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. कॅम्पमधल्या एका खोलीत भला मोठा साप असल्याचं आढळून आलं. दहशतवाद्यांचा सामना करणाऱ्या जवानांना या सापशी कसं लढावं हेच कळत नव्हतं.

शेवटी एका सर्पमित्राला पाचारण करण्यात आलं. त्या सर्पमित्राने जेव्हा त्या सापाला पाहिलं तेव्हा त्यालाही आश्चर्याचा धक्काच बसला. कारण एवढा मोठा साप त्याने पहिल्यांदाच पाहिला होता. त्याने जेव्हा त्या सापाला आणखी बघितलं तेव्हा तो विषारी कोब्रा असल्याचं त्याच्या लक्षात आलं.

त्यानंतर मोठ्या शिताफीने त्याने आपलं सगळं कौशल्या पणाला लावून सापाला पकडलं तेव्हा तो आणखी आश्चर्यचकीत झाला कारण त्या सापाची लांबी जेव्हा मोजण्यात आली तेव्हा तो तब्बल 12 फुटांचा भरला. एवढ्या लांबींचा कोब्रा क्विचितच सापडतो असं म्हटलं जातं. हा कॅम्प असलेल्या भागात बऱ्यापैकी झाडी आहे. त्यातच सध्या थोडं ढगाळ वातावरण असल्यामुळे या काळात साप बिळातून बाहेर निघतात, त्यामुळे तो साप बाहेर पडला असावा असं म्हटलं जातं. या 12 फुटांच्या कोब्राला आता जंगलात सोडलं जाणार आहे.

First published: June 12, 2019, 9:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading