95 व्या वर्षी मिळालं पद्मभूषण, पाकिस्तानातून भारतात येऊन असा उभा केला कोटींचा व्यवसाय

MDH उद्योगसमुहाचे प्रमुख धर्मपाल गुलाटी यांची शतकी वाटचाल सुरू असताना ते आजही जोमानं काम करतात. त्यांच्याविषयीच्या या खास 10 गोष्टी वाचून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल.

News18 Lokmat | Updated On: Jan 28, 2019 06:33 PM IST

95 व्या वर्षी मिळालं पद्मभूषण, पाकिस्तानातून भारतात येऊन असा उभा केला कोटींचा व्यवसाय

आर्यसमाजाचे अनुयायी - धर्मपाल गुलाटी हे आर्यसमाजाचे कट्टर अनुयायी आहेत. राजधानी नवी दिल्लीत त्यांच्याच पुढाकाराने गेल्या वर्षी विश्व आर्यसमाज संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनात जगभरातल्या अनेक देशांमधून आर्यसमाजचे अनुयायी आले होते.

धर्मपाल यांच्या वडिलांनी सियालकोटमध्ये (पाकिस्तानात) 1919 साली मसाल्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला होता. फाळणीनंतर गुलाटी कुटुंबीय दिल्लीत स्थायिक झाले. तेव्हा सुरूवातीला त्यांनी उपजिविकेसाठी टांगाही चालवला होता. त्यानंतर करोलबाग इथं एका लाकडाच्या लहानश्या पेटील मसाले विकायला सुरुवात केली. तेव्हापासून तो व्यवसाय वाढतच गेला.

धर्मपाल हे एमडीएच मसाल्याचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहेत. गेली अनेक वर्ष ते कंपनीच्या मसाल्यांचे ब्रॅण्डींग करतात. आणि त्यांच्या त्या जाहीरातीला उत्तम प्रतिसादही मिळतो. एमडीएच मसाल्याच्या प्रत्येक पाकिटावर त्यांचा फोटो असतो.

Loading...

एमडीएचची सुरुवात छोट्या स्तरपासून झाली असली तरी कंपनीचा आजचा व्याप प्रचंड मोठा आहे. देशातल्या मसाला बाजारात कंपनीचा वाटा 12 टक्के आहे. कंपनी 62 प्रकारची उत्पादनं तयार करते. ही सर्व उत्पादनं 150 पॉकेट्समध्ये उपलब्ध आहेत.

धर्मपाल गुलाटी हेच कंपनीचे सीईओ आहेत. त्याचं वार्षिक वेतन पाहून कुणालाही आर्श्चयाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. दोन वर्षांपूर्वी त्यांचं वार्षिक वेतन हे 24 कोटी रुपये होतं. त्याचबरोबर कंपनीत त्यांचा 80 टक्के हिस्साही आहे. आपल्या वेतनामधला 90 टक्के हिस्सा आपण सामाजिक कार्यासाठी देतो असा त्यांचा दावा आहे.

एमडीएचची वार्षिक उलाढाल 1500 कोटींच्याही वर आहे. त्यांच्या कंपनीकडे 15 कारखाने असून 1000 डिलर्सचं जाळं आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये त्याची उत्पादनं विकली जातात. आणि अनेक शहरांमध्ये त्यांची ऑफिसेसही आहेत.

डोक्यावर खास फेटा आणि रूबाबदार राहणी हे धर्मपाल यांचं खास वैशिष्ट्यं. त्यामुळेच त्यांना एमडीएच वाले दादाजी असंही म्हणतात. तर काही लोक त्यांना महाशय या नावानेही ओळखतात. ते कायम आपल्या डिलर्सना भेटत असतात.

धर्मपाल यांनी गेल्या 60 वर्षांमध्ये दिल्लीत 20 शाळा आणि अनेक हॉस्पिटल्स उघडली आहेत. त्यांची कंपनी कंत्राटी शेतीही करते. त्यात मसाल्याची उत्पादनं घेतली जातात. कर्नाटक, राजस्थान त्याचबरोबर इराण आणि अफगाणिस्तामधूनही त्यांची कंपनी मसाल्यासाठीचा माल खरेदी करते.

धर्मपाल यांना एक मुलगा आणि सहा मुली आहेत. मुलगा हा आता सगळा व्यवहार सांभाळतो. तर सहा मुली विभागवार कंपनीचा वितरण व्यवसाय सांभाळतात.

धर्मपाल यांचं शिक्षण फक्त पाचवी पर्यंतच झालं आहे. वडिलांपेक्षा वेगळा व्यवसाय करून त्यांना यशस्वी व्हायचं होतं. त्यामुळं त्यांनी अनेक व्यवसाय करून बघितले. पण त्यांना यश आलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2019 06:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...