देशभरात 1109 शेतकऱ्यांच्या आत्महत्येपैकी 986 महाराष्ट्रातले !

2016 मध्ये देशात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी जवळपास 85 टक्के शेतकरी हे महाराष्ट्रातले असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2017 08:35 PM IST

देशभरात 1109 शेतकऱ्यांच्या आत्महत्येपैकी 986 महाराष्ट्रातले !

18 जुलै : महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी स्मशानभूमी झालाय का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण 2016 मध्ये देशात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी जवळपास 85 टक्के शेतकरी हे महाराष्ट्रातले असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये.

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरू आहे. देशात झालेल्या शेतकऱ्यांच्या एकूण ११०९ पैकी ९८६ आत्महत्या एकटया महाराष्ट्रात झाल्याची माहिती सरकारनं लोकसभेत लेखी उत्तरात दिली आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण २०१४ मध्ये २६ टक्क्यांवर पोहोचले असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ११०९ वर पोहोचली आहे आणि त्यापैकी बहुसंख्य आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

राज्यातले शेतकरी आत्महत्यांच्या दृष्टचक्रात अडकलेले असताना सरकारनं कर्जमाफी देण्यात चालढकल केली. जेव्हा दिली तेव्हाही निकषांच्या कात्रीत शेतकऱ्यांना अडकवलं. अभ्यास करणाऱ्या सरकारनं ही आकडेवारी पाहून तरी शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा मिळेल अशा उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा केली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 08:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...