भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आज 94वा वाढदिवस

गेल्या 10 दहा वर्षात देशाचं सगळं राजकारण बदलून गेलं. सत्ता उलथून पडल्या, सत्तेचे चेहरे बदलले पण त्यांचा आवाज आपल्यासाठी कधीच नाही बदलला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 25, 2017 04:11 PM IST

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आज 94वा वाढदिवस

25 डिसेंबर : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आज 94वा वाढदिवस आहे. अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारताच्या राजकारणातलं एक लाडकं व्यक्तिमत्व. लोकनेते असा नावलौकिक असलेले अटलजी म्हणजे राजाकारणात तत्वांशी अटल राहाणारे नेते. त्यांची ओघवती भाषणं काळजाला भिडतात तर कधी देशभक्तीनं रोमांचित करणाऱ्या त्यांच्या कवितांनी आपल्याला नेहमीच समृद्ध केलं.

गेल्या 10 दहा वर्षात देशाचं सगळं राजकारण बदलून गेलं. सत्ता उलथून पडल्या, सत्तेचे चेहरे बदलले पण त्यांचा आवाज आपल्यासाठी कधीच नाही बदलला. अटलजी भलेही राजकीय पटलावरून दूर गेले असतील पण त्यांच्या व्यक्तित्वाचा ठसा आजही कायम आहे.

'गीत नया गाता हूँ...बेनकाब चेहरे है' काळजाला हात घालणारे अटलजींचे हे शब्द. त्यांचा आवाज कानावर पडला की अंगावर रोमांच उभे राहातात. हिमालया इतके उत्तुंग कवी, महान वक्ते, तपस्वी राजकारणी, यशस्वी पंतप्रधान. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा सगळ्या देशानं एका शब्दात गौरव केला. तो म्हणजे 'भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी'.

अटलजी म्हणजे नैतिक मुल्यांवर अढळ श्रद्धा असणारे एक आदर्श राजकारणी, अटलजी म्हणजे कणखर नेतृत्व, अटलजी म्हणजे प्रखर देशभक्त.

अटलजीचं व्यक्तित्व हे देशातील कोट्यवधी लोकांना कायम प्रेरणादायी, आश्वासक आणि मार्गदर्शक आहे. त्यामुळे वाजपेयी जात, पात, धर्म, पक्ष, पंथ या सगळ्यांच्या पलीकडे जाणाऱ्या भारताच्या या लाडक्या व्यक्तिमत्वाला न्यूज18 लोकमतच्या खूप खूप शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2017 04:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...