Home /News /national /

कोरोनाचा धोका वाढणार, तब्बल 90 हजार भारतीय नागरिक परतले मायदेशी

कोरोनाचा धोका वाढणार, तब्बल 90 हजार भारतीय नागरिक परतले मायदेशी

गेल्या काही दिवसांत तब्बल 90 हजार परदेशात राहणारे नागरिक भारतात परतले आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

    पंजाब, 24 मार्च : कोरोनाचा (coronavirus) धोका दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही झपाट्याने कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळं देशातील सर्व राज्यांमध्ये लॉक डाऊन करण्यात आले आहे. तर महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या भारतात 500हून जास्त झाली आहे. तर आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाल आहे. मुख्य म्हणजे गेल्या काही दिवसांत तब्बल 90 हजार परदेशात राहणारे नागरिक भारतात परतले आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. परदेशातून आलेले नागरिक सगळ्यात जास्त पंजाबमध्ये स्थायिक आहेत. त्यामुळे पंजाब सरकारने Covid-19च्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी आयसोलेशन वॉर्ड आणि इतर इमारती बांधण्यासाठी केंद्राकडे निधी मागितला आहे. पंजाबचे आरोग्य मंत्री बीएस सिद्धू यांनी, “पंजाबमध्ये बरेच अनिवासी भारतीय आहेत आणि गेल्या तीन-चार महिन्यांत 90,000 लोक येथे आले आहेत. आम्ही केंद्राकडे पायाभूत सुविधा, आयसोलेशन वॉर्ड आणि इतर काही गोष्टी तयार करण्यासाठी 150 कोटींची मदत मागितली आहे”, असे सांगितले. वाचा-कर्फ्यूमध्येही मोकाट फिरणाऱ्यांचा होणार बंदोबस्त, महिला पोलीस अधिकारी रस्त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू जाहीर केल्यानंतर पंजाबमध्ये दुसऱ्याच दिवशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळं लोकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंजाबमध्ये अनिवासी भारतीय नागरिक वाढल्यामुळे तेथील परिस्थिती अधिक चिंताजनक झाली आहे. यासाठी 20 कोटींचा मुख्यमंत्री मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. वाचा-जग 2008-09 पेक्षाही भयावह मंदीच्या खायीत लोटलं जाणार, IMFच्या संचालकांचा इशारा आज मोदी करणार महत्त्वाची घोषणा वैश्विक महामारी कोरोनाव्हायरसचा फैलाव हा वेगाने वाढत आहे. त्यावर अतिशय महत्त्वाची माहिती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. 24 मार्चला रात्री 8 वाजता मोदी हे देशाशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते कोरोनाविषयी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. आधीही पंतप्रधानांनी देशाशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आणि त्याला देशातील जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मोदी हे जनतेला महत्त्वाच्या सूचना देणार असून काही कठोर निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. वाचा-पंतप्रधान मोदी पुन्हा 8 वाजता देशाला करणार संबोधित, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या