सर्व विषयात 90 गुण मात्र गणितात पडले 2; पुनर्तपासणीत मिळाले 100 पैकी 100

सर्व विषयात 90 गुण मात्र गणितात पडले 2; पुनर्तपासणीत मिळाले 100 पैकी 100

ही विद्यार्थिनी दिव्यांग असून निकाल पाहताच तिला धक्का बसला

  • Share this:

हरियाणा, 9 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून विविध बोर्डाच्या परीक्षांचे निकाल समोर येत आहेत. अशातच हरियाणा बोर्डाचा दहावीचा निकाल समोर आला आहे. यामध्ये एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या सुप्रिया नावाच्या एका दिव्यांग विद्यार्थिनीला दहावीत गणिताच्या पेपरमध्ये केवळ 2 गूण मिळाले होते.

त्यानंतर विद्यार्थिनीने पेपर पुनर्तपासणीसाठी पाठविला. त्यानंतर आलेला निकाल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. या विद्यार्थिनीचे 98 मार्क वाढले आणि तिला या विषयावर पैकीच्या पैकी गूण मिळाले.

हे वाचा-आता नियम मोडणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सची खैर नाही, आरोग्य मंत्र्यांचा इशारा

सुप्रिया अंध असून तिने दिव्यांग कोट्यातून दहावीची परीक्षा दिली होती. तिला गणित विषयात केवळ 2 मार्क मिळाले होते. हा निकाल पाहून ती खूप दु:खी झाली होती. सुप्रियाला सर्व विषयात 90 पेक्षा जास्त गुण असून केवळ गणित विषयातच इतके कमी गुण कसे..यामुळे तिच्या व़डिलांनी गणिताचा पेपर रिचेकिंगला टाकला.

हे वाचा-लक्षण विरहित कोरोना रुग्णच व्हायरसचा करतील नाश; संशोधकांचा दावा

त्याचा निकाल पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला, यानंतर सुप्रियाने हरियाणा बोर्डाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. निकालांबाबत झालेला हा गोंधळामुळे विद्यार्थ्यांवरील ताण वाढतो. विशेष म्हणजे सुप्रियाचे वडील हे गणित विषयाचे शिक्षक आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: August 9, 2020, 3:58 PM IST
Tags: 10 th exam

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading