भारतातील 9 श्रीमंत व्यक्तींकडे देशातील अर्धी संपत्ती

भारतातील 9 श्रीमंत व्यक्तींकडे देशातील अर्धी संपत्ती

2018मध्ये देशातील करोडपतींच्या संपत्तीत प्रत्येक दिवशी 2 हजार 200 कोटी रुपयांची वाढ झाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जानेवारी: देशातील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील संपत्ती वाटपाचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. 2018मध्ये देशातील करोडपतींच्या संपत्तीत प्रत्येक दिवशी 2 हजार 200 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ऑक्सफॅमने केलेल्या अभ्यासानुसार भारतातील 9 श्रीमंत लोकांकडे देशातील अर्धी संपत्ती आहे. दावोसमध्ये होणाऱ्या पाच दिवसांच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीच्या आधी हा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे.

देशातील एक टक्के श्रीमतांच्या संपत्तीत 2018मध्ये 39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर याच काळात सर्वात गरीब असलेल्या लोकांच्या संपत्ती केवळ 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील सर्वात गरीब असलेल्यापैकी 10 टक्के लोक (13.6 कोटी) 2004पासून कर्जात बुडाले आहेत.

गरीब आणि श्रीमंत यांच्यातील संपत्ती वाटपाचे दरी जागतिक पातळीवर देखील दिसून येते. 2018मध्ये जगभरातील करोडपतींच्या संपत्तीत 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गरीब असलेल्या लोकांच्या संपत्तीत 11 टक्क्यांची घट झाली आहे. जगातील 3.8 बिलियन गरीब लोकांकडे जितकी संपत्ती आहे तितकी केवळ 26 श्रीमंत लोकांकडे आहे.

PHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने

First published: January 21, 2019, 10:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading