Home /News /national /

धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून 10 दिवस प्यायले सॅनिटायझर, 9 लोकांचा मृत्यू

धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून 10 दिवस प्यायले सॅनिटायझर, 9 लोकांचा मृत्यू

सॅनिटायझरमध्ये अल्कोहलचं प्रमाण जास्त असल्याने आग लागू शकते. त्यामुळे वापर करतांना ते आगीच्या संपर्कात यायला नको याची काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सॅनिटायझरमध्ये अल्कोहलचं प्रमाण जास्त असल्याने आग लागू शकते. त्यामुळे वापर करतांना ते आगीच्या संपर्कात यायला नको याची काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

दारू मिळाली नाही म्हणून तब्बल तीन दिवस येथील काही लोकं सॅनिटायझरचे सेनन करत होते. यामुळे आतापर्यंत 9 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

    प्रकाशम (आंध्र प्रदेश), 31 जुलै : कोरोनाच्या संकटात सध्या सॅनिटायझरचा वापर आणि मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील कुरीचेडू गावात एक धक्कादायक प्रकार घडला. दारू मिळाली नाही म्हणून तब्बल तीन दिवस येथील काही लोकं सॅनिटायझरचे सेनन करत होते. यामुळे आतापर्यंत 9 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 10 दिवसांपासून या गावातील तब्बल 20 लोकं सॅनिटायझरचे सेवन करत होते. या सगळ्यांना त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी (29 जुलै रोजी) सॅनिटायझर प्यायल्यामुळे पहिला मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवारी (30 जुलै रोजी) एकाच दिवसात तिघांचा मृत्यू झाला. तर आज सकाळी तब्बल 6 लोकांचा सॅनिटायझर प्यायल्यामुळे मृत्यू झाला आहे. मृतांचे वय 25 ते 65 दरम्यान असल्याची माहिती मिळाली आहे. दम्यान, स्थानिक पोलिसांनी गावातमध्ये असलेल्या दुकानातील सॅनिटायझर जप्त करून लॅबमध्ये पाठवले आहे. पोलीस सध्या कुरीचेडू गावातील लोकांची चौकशी करत आहेत. तसेच किती जणांनी सॅनिजायझरचे सेवन केले आहे, याबाबत माहिती मिळवत आहेत. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तब्येत बिघडली होती. मृतांनी नेमके किती सॅनिटायझर प्यायले होते, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही आहे. कुरीचेडू गावात गेल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे 10 दिवसांपासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गावातील दारूची दुकानं बंद होती. आंध्र प्रदेश राज्य सरकारने 4 मेपासून राज्यातील दुकानं खुली केली होती. मात्र कुरीचेडू गावात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर या गावात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या