कर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा जागीच मृत्यू

कर्नाटकातील भीषण दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 09:03 AM IST

कर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा जागीच मृत्यू

विजापूर, 22 मार्च - कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात गोव्याहून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. सिंदगी परिसरातील ही घटना आहे. क्रूझर आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी (22 मार्च) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातात क्रूझरमधील नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. 20 ते 30 वयोगटातील तरुणांचा मृतांमध्ये समावेश आहे. मृत्युमुखी पडलेले पर्यटक हे कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील रहिवासी होते. घटनास्थळावर पोलीस दाखल झाले आहेत.


==========================================================================================

VIDEO : सुर्यमुखी कार्यकर्त्यांनो, अजित पवारांनी टोचले कान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 08:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close