मराठी बातम्या /बातम्या /देश /

9 बजे 9 मिनट: PM मोदींनी लॉकडाऊनमध्ये केलेल्या 'या' ट्वीटने बनवला अनोखा रेकॉर्ड

9 बजे 9 मिनट: PM मोदींनी लॉकडाऊनमध्ये केलेल्या 'या' ट्वीटने बनवला अनोखा रेकॉर्ड

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व देशवासियांना 5 एप्रिल रोजी 9 वाजून 9 मिनिटांनी लाइट्स बंद करून लँप, पणत्या, सेलफोन फ्लॅश सुरू करण्याचं आवाहन केलं होतं.

नवी दिल्ली, 08 डिसेंबर : कोरोना काळात (Coronavirus) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या एका ट्वीटने अनोखा रेकॉर्ड रचला आहे. राजकीय नेत्याचे सर्वाधिक रिट्वीट झालेलं ट्वीट मोदींच्या नावे आहे. पीएम नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना लॉकडाऊन काळात दीप प्रज्वलन करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर त्यांनी स्वत: दीप प्रज्वलित करतानाचे फोटो पोस्ट केले होते. याच ट्वीटने हा रेकॉर्ड बनवला आहे. हे ट्वीट ट्विटरवर भारतीय राजकारणात सर्वाधिक रिट्वीट करण्यात आलेले ट्वीट (Most Retweeted Tweet by a Politician in 2020 in India) आहे. ट्विटर इंडियाने याबाबत मंगळवारी माहिती दिली आहे.

कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना एक खास आवाहन केलं होतं. एप्रिल 2020 मध्ये देशभरातील नागरिकांना त्यांनी आवाहन केलं होतं की, कोरोना योद्ध्यांना (Corona Warriors) सलाम करण्यासाठी 05 एप्रिल 2020 रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्यात यावे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दीप लावताना एक फोटो पोस्ट केला होता. या ट्वीटने हा रेकॉर्ड सेट केला आहे. ट्विटर इंडियाच्या मते हे ट्वीट भारतात रिट्वीट करण्यात आलेले पहिल्या क्रमांकाचे राजकीय ट्वीट आहे. पीएम मोदींचे हे ट्वीट 1 लाख 18 हजार वेळा रिट्वीट करण्यात आले आहे. हे ट्वीट 5 लाख 13 हजार वेळा लाइक करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संबोधनामध्ये सर्व देशवासियांना 5 एप्रिल रोजी 9 वाजून 9 मिनिटांनी लाइट्स बंद करून लँप, पणत्या, सेलफोन फ्लॅश सुरू करण्याचं आवाहन केलं होतं. ट्विटरवर पीएम नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी एक श्लोक देखील पोस्ट केला होता. त्यांनी यामध्ये संस्कृतमध्ये असं लिहिलं होतं की, 'शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा। शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते॥'

2020 मधील शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. अशावेळी ट्विटर इंडिया (Twitter India) कडून पूर्ण वर्षातील काही आठवणी शेअर केल्या जात आहेत. ट्विटरकडून सर्वाधिक रिट्वीट करण्यात आलेलं ट्वीट, सर्वाधिक लाइक करण्यात आलेलं ट्वीट, व्हायरल ट्वीट आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील ट्वीट्सबद्दल सांगण्यात येत आहे.

First published:

Tags: PM Naredra Modi, Twitter