Home /News /national /

देशातील 80 टक्के शिक्षकांचं लसीकरण पूर्ण, केंद्र सरकारनं Google Tracker वरून मिळवली माहिती

देशातील 80 टक्के शिक्षकांचं लसीकरण पूर्ण, केंद्र सरकारनं Google Tracker वरून मिळवली माहिती

देशातील सुमारे 80 टक्के (80% teaching and non teaching staff) शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण (Vaccination) झाल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे.

    नवी दिल्ली, 3 सप्टेंबर : देशातील अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची (Corona patients) आकडेवारी वाढायला सुरुवात झाली असताना बहुतांश राज्यांनी (states) शाळा सुरु (Schools open) करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सुमारे 80 टक्के (80% teaching and non teaching staff) शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण (Vaccination) झाल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. केंद्र सरकारने गुगल ट्रॅकरचा (Google tracker) वापर करून ही माहिती शोधली आहे. कोरोना आणि शाळा देशातील महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असल्याचं चित्र आहे. काही राज्यांमधील मृत्यूमध्येदेखील वाढ होत चालली आहे. अशा परिस्थितीत देशातील जवळपास 20 राज्यांमध्ये शाळा सुरु झाल्या आहेत, तर इतर राज्यांमध्ये त्या सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. शाळा सुरु होत असल्यामुळे शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं लसीकरण होणं अत्यावश्यक आहे. याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारनं गुगल ट्रॅकरचा वापर केला आणि देशातील विविध राज्यात शिक्षकांच्या लसीकरणाची सद्यस्थिती जाणून घेतली. असं आहे चित्र देशातील एकूण 80 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं आहे. त्यातील काहींनी दोन्ही लसी घेतल्या आहेत, तर बहुतांश शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी एक लस घेतली आहे. सप्टेंबर महिना संपेपर्यंत देशातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत. त्यासाठी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याची सूचनाही केंद्र सरकारनं राज्यांना केली आहे. हे वाचा - मुल्ला बरादर करणार अफगाणिस्तानमधील नव्या सरकारचं नेतृत्त्व: तालिबान सूत्र शिक्षकांच्या लसीकरणाला वेग ज्या शिक्षकांचं लसीकरण झालेलं नाही, त्यांना तातडीने लस देण्याच्या सूचना केंद्र सरकारनं राज्यांना दिल्या आहेत. तर ज्या शिक्षकांना पहिला डोस देण्यात आला आहे, त्यांना दुसरा डोस देण्यात यावा, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत किमान प्रत्येक शिक्षकाने 1 डोस घेतलेला असणे आवश्यक असल्याचं टार्गेट केंद्रानं राज्य सरकारांना दिलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Corona vaccination, Coronavirus, School teacher

    पुढील बातम्या