नोकरी द्या, नोकरी... भारतातल्या 80 टक्के इंजिनिअर्सची व्यथा

नोकरी द्या, नोकरी... भारतातल्या 80 टक्के इंजिनिअर्सची व्यथा

भारतात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या 80 टक्के तरुणांना नोकरी मिळणं कठीण झालं आहे. सध्याच्या आयटी कंपन्यांवर आधारित असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांना नोकऱ्या मिळण्यात अडचणी येत आहेत, असा एका सर्व्हेचा निष्कर्ष आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 एप्रिल : भारतात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या 80 टक्के तरुणांना नोकरी मिळणं कठीण झालं आहे. सध्याच्या आयटी कंपन्यांवर आधारित असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांना नोकऱ्या मिळण्यात अडचणी येत आहेत, असा एका सर्व्हेचा निष्कर्ष आहे.

हा सर्व्हे इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या तरुणांमध्ये करण्यात आला होता. देशभरातल्या 750 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 1 लाख 70 हजार विद्यार्थ्यांना हे प्रश्न विचारण्यात आले.

हा जमाना आयटी कंपन्यांचा आहे पण या कंपन्यांना लागणारी प्रोग्रॅमिंग आणि अल्गोरिदमची कौशल्यं भारतीय तरुणांना अवगत नाहीत. या सर्व्हेमध्ये सुमारे 90 टक्के तरुणांकडे ही कौशल्यं नाहीत हे समोर आलं. त्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना नोकऱ्या मिळणं कठीण झालं आहे.

कोडिंग आणि डिकोडिंग

भारतीय आणि चिनी इंजिनिअर्सपेक्षा अमेरिकन तरुणांकडे ही कोडिंग, डिकोडिंगची कौशल्यं जास्त आहेत,असाही सर्व्हेचा निष्कर्ष आहे.

सुमारे 38 टक्के तरुण कोड तयार करू शकत नाहीत. त्यामुळेच या तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण मोठं आहे.

आयटी क्षेत्रातल्या नव्या नोकऱ्यांसाठी भारताला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मोठी सुधारणा घडवावी लागणार आहे. यामध्ये सरकारनेही हस्तक्षेप करून कॉलेजांबद्दल धोरण ठरवावं लागेल.

कॉलेजमध्येच हवी सुधारणा

या कॉलेजेसमघ्ये जे शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं ते त्यांना नोकऱ्या मिळवण्यासाठी सक्षम करेल का हेही पाहावं लागेल. त्यासाठी या कॉलेजेसनी वेगवेगळे संशोधन प्रकल्प हाती घ्यावे लागतील. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी संधी निर्माण करणं आणि प्रोजक्ट हाती घेऊन तो राबवणं, असे उपक्रमही राबवावे लागतील.

विद्यार्थ्यांना जर कॉलेजमध्येच व्यावसायिक स्वरूपाचं शिक्षण दिलं गेलं तरच ते नोकऱ्या मिळवण्यासाठी पात्र ठरू शकतील.त्यासाठी या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचीही मदत घ्यावी लागेल,असं या सर्व्हेमध्ये म्हटलं आहे.

===============================================================================================================================================================

मुंबईत चर्चगेट स्थानकावर भरगर्दीत चोरट्याने मोबाईल पळवला, VIDEO व्हायरल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 05:04 PM IST

ताज्या बातम्या