News18 Lokmat

अवकाळी पावसाचे गुजरातमध्ये 8 बळी, शेतीचं मोठं नुकसान

मंगळवार गुजरातसाठी अमंगळ ठरला असेच म्हणावे लागेल. कारण, अवकाळी पाऊस आणि त्यावेळी आलेल्या वादळामुळे 8 लोकांना आपला जीव गमवावा लागला.

News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2019 10:32 PM IST

अवकाळी पावसाचे गुजरातमध्ये 8 बळी, शेतीचं मोठं नुकसान

अहमदाबाद, 16 एप्रिल : मंगळवार गुजरातसाठी अमंगळ ठरला असेच म्हणावे लागेल. कारण, अवकाळी पाऊस आणि त्यावेळी आलेल्या वादळामुळे 8 लोकांना आपला जीव गमवावा लागला. गुजरातमधील विविध भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यावेळी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळं काही दुर्घटना घडल्या. यामध्ये 8 जण ठार झाले. शिवाय, शेतीचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.

दुपारी गुजरातच्या पाटण, राजकोट, अरावल्ली, बनासकांठा, मेहसाना, गांधीनगर, सुरेंद्रनगर आणि मोरबी जिल्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. त्यामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. झाडं उन्मळून पडणे, वीज पडणे यासारख्या दुर्घटना देखील घडल्या. त्यामुळे काही जिल्ह्यातील रस्ते वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम झाला. शिवाय, जनजीवन देखील विस्कळीत झालं. काही घराचं देखील नुकसान झालं.

पंतप्रधानांच्या सभेकरता तयार केलेल्या पंडालचं देखील नुकसान

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी साबरकाठ जिल्ह्यामध्ये सभा घेणार आहेत. पण, पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे सभे ठिकाणचं छत देखील उडून गेलं. खुर्च्यावर झाडं पडली. त्यामुळे सभेच्या काही तास आधी झालेल्या पावसामुळं व्यवस्थापकांची मोठीच धावपळ झाली. अरबी समुद्रामध्ये झालेल्या बदलामुळं अवकाळी पावसानं हजेरी लावली.

दरम्यान, राज्यातील काही भागात देखील सोमवारी हजेरी लावली. तर काही ठिकाणचं वातावरण अद्याप देखील ढगाळ आहे.

Loading...


VIDEO : विश्वास न बसणारी घटना, तब्बल 220 km समुद्रात पोहत गेला हा कुत्रा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 10:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...