S M L

चेन्नईत मुसळधार पावसामुळे 12 लोकांचा मृत्यू

गेले आठ दिवस चेन्नई मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे चेन्नई आणि परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. चेन्नईतील मैलापूर, फोरशोर इस्टेट आणि तांबरम, क्रोमपेट आणि पल्लवरम भागांना मुसळधार पावसाचा जास्त फटका बसला आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 4, 2017 04:56 PM IST

चेन्नईत मुसळधार पावसामुळे 12 लोकांचा मृत्यू

चेन्नई, 04 नोव्हेंबर: तामिळ नाडूची राजधानी असलेल्या  चेन्नईमध्ये गेल्या 8 दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसामुळे आतापर्यंत 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाऊस थांबायचं नाव घेत नसल्याने 2015 साल सारखी पूर परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.

गेले आठ दिवस चेन्नई मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे चेन्नई आणि परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. चेन्नईतील मैलापूर, फोरशोर इस्टेट आणि तांबरम, क्रोमपेट  आणि  पल्लवरम भागांना मुसळधार पावसाचा जास्त फटका बसला आहे. चेन्नईत आतापर्यंत 105 बचाव शिबिरं कार्यरत आहेत. तामिळ नाडूचे मुख्यमंत्रीनीही काही ठिकाणी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.  पाणी साचून पुन्हा  2015 साल सारखा पूर येऊन जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका वर्तवला जातो आहे.

दरम्यान मद्रास हाय कोर्टाने पाण्याचा निचरा होण्यासाठी काय पाऊलं उचलली  याचा  अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.तसंच चेन्नईतील सरोवर  आणि पाणीसाठ्यांवर झालेले अतिक्रमण हटवण्याचे  आदेश दिले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2017 04:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close