८ लोकांनी गरोदर बकरीवर केला सामुहिक बलात्कार

बलात्काराच्या दुसऱ्या दिवशी बकरीचा मृत्यू झाला

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2018 04:13 PM IST

८ लोकांनी गरोदर बकरीवर केला सामुहिक बलात्कार

मेवत, २९ जुलैः हरियाणातील मेवातमध्ये एका बकरीवर आठ लोकांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बलात्काराच्या दुसऱ्या दिवशी बकरीचा मृत्यू झाला. बकरीच्या मालकाने २६ जुलैला या प्रकरणी तक्रार नोंदवली. पोलीस याप्रकरणाशी चौकशी करत आहेत. ज्या आरोपींविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे, ते सर्व आरोपी फरार आहेत. मृत बकरीची वैद्यकीय चाचणी केली असून, लवकरच त्याच्या अहवाल मिळेल. ज्या बकरीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला ती बकरी गरोदर होती.

Loading...

नगीना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजबीर सिंहने सांगितले की, ‘असलू नावाच्या व्यक्तीने २६ जुलैला ठाण्यात तक्रार नोंदवली. २५ जुलैला त्यांच्या बकरीवर सवकर, हारून, जाफर आणि अन्य पाच व्यक्तींनी बलात्कार केला. इतर पाच लोकांची ओळख अजून पटायची आहे.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2018 04:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...