Home /News /national /

देशाला हादरावून सोडणारी बातमी, लखीमपूरची घटना पूर्वनियोजित, SIT चा ठपका

देशाला हादरावून सोडणारी बातमी, लखीमपूरची घटना पूर्वनियोजित, SIT चा ठपका

Lakhimpur Violence ऑक्टोबर महिन्यात लखीमपूरमध्ये (lakhimpur kheri case) ही घटना घडली होती. या घटनेमुळे देशात खळबळ उडाली होती.

Lakhimpur Violence ऑक्टोबर महिन्यात लखीमपूरमध्ये (lakhimpur kheri case) ही घटना घडली होती. या घटनेमुळे देशात खळबळ उडाली होती.

Lakhimpur Violence ऑक्टोबर महिन्यात लखीमपूरमध्ये (lakhimpur kheri case) ही घटना घडली होती. या घटनेमुळे देशात खळबळ उडाली होती.

    नवी दिल्ली, 14 डिसेंबर : मोदी सरकारने (modi government) आणलेल्या नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन पुकारले होते. मात्र,  उत्तर प्रदेशमधील (uttar pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Violence) येथे शेतकरी आंदोलनादरम्यान भाजप मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या आगावर गाडी घातली होती. या घटने 8 जणांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला ही घटना निष्काळजीपणे झाली असावी असं सांगितलं जात होतं. पण, हा पूर्वनियोजित कट होता, असा ठपका SIT ने ठेवला आहे. ऑक्टोबर महिन्यात लखीमपूरमध्ये ही घटना घडली होती. या घटनेमुळे देशात खळबळ उडाली होती. खीरीचे दोन वेळा खासदार राहिलेले आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या मूळ बनबीरपुर गावात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य रविवारी येणार होते. याचाच विरोध शेतकरी करत होते. त्यावेळी मिश्रा यांचा मुलाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने स्वत : हुन याची दखल घेतली. या प्रकरणी एक एसआयटी स्थापन करण्यात आली होती. लखीमपुर खीरी प्रकरणात स्थापन एसआयटीने हा निष्काळजीपणाने घडलेला प्रकार नव्हे तर पूर्णपणे नियोजित कट असल्याचा ठपका ठेवला आहे.  आधीची किरकोळ कलमे वगळून गंभीर कलमे लावण्याचेही निर्देश दिले आहे.  रिपोर्टनंतर संयुक्त किसान मोर्चाने या कटाचे सूत्रधार अजूनही मंत्रिमंडळात असल्याबद्दल खंत व्यक्त केली. काय आहे प्रकरण  लखीमपूर खेरीचे दोन वेळा खासदार राहिलेले आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या मूळ बनबीरपुर गावात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य रविवारी येणार होते. याचाच विरोध शेतकरी करत होते मात्र यादरम्यानच झालेल्या गोंधळात आठ जणांचा मृत्यू झाला. यात चार शेतकऱ्यांचाही समावेश होता. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, मिश्रा यांचा मुलगा ज्या एसयूव्हीमध्ये बसला होता, त्याने शेतकऱ्यांना चिरडले आणि त्यात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. भाजपवर चोहीबाजूने टीका झाली होती. अखेरीस मोदी सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले.  पण आता SIT ने ठपका ठेवल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीच्या तोंडावर वाद पेटण्याची चिन्ह आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या