केंद्राच्या या 'खास गिफ्ट'मुळे कर्मचारी होणार मालामाल!

केंद्राच्या या 'खास गिफ्ट'मुळे कर्मचारी होणार मालामाल!

सरकारने हा निर्णय घेतला तर 68 लाख कर्मचाऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 14 जानेवारी : सर्वणांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकार सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक चांगला निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सरकार या बैठकीत घेऊ शकते. निवडणुका जवळ आल्याने त्यावर तातडीने निर्णय होण्याची शक्यता आहे.

सरकारने हा निर्णय घेतला तर 68 लाख कर्मचाऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे. अर्थमंत्रालयात यावर तयारी सुरू आहे. आकडेमोडीत अधिकारी व्यस्त आहेत. हा निर्णय घेतल्यानंतर सरकारवर किती हजार कोटींचा बोजा पडणार याचा आढावा घेण्यात येत आहे.

हा निर्णय झाला तर 18 हजार किमान वेतन असणाऱ्यांचं वेतन वाढून 21 हजार रुपये होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून हा आयोग तातडीने लागू करावा अशी मागणी होत होती. आता निवडणुकीच्या तोंडावर हा प्रश्न प्रलंबित ठेवला तर त्याचा फटका सरकारला बसू शकतो.

त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कर्मचाऱ्यांबरोबरच निवृत्ती वेतनधारकांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे.

राज्य सरकारनेही लागू केला सातवा वेतन आयोग

डिसेंबर महिन्यात राज्य सरकारनेही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयाला मंजूरी दिली होती. साधारणपणे 23% वेतनवाढ मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 17 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आणि 7 लाखांपेक्षा जास्त पेन्शन धारकांना याचा लाभ होणार आहे. या सगळ्यामुळे सरकारी तिजोरीवर  दरवर्षी  24 हजार 485 कोटींचा बोजा पडणार आहे.

नवीन वर्षापासून सातवा वेतन आयोग लागू व्हावा, केंद्र सरकारप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा असावा आणि सेवानिवृत्तीची मर्यादा वाढवून 60 वर्षं करण्यात यावी  तसंच  रिक्त पदं तातडीनं भरण्यात यावीत अशी मागणी महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघाने केली होती. सातव्या वेतन आयोगानुसार राज्य कर्मचाऱ्यांना घसघशीत 23% वेतनवाढ मिळणार आहे.

News18 Lokmat Impact : 35 दिवसांत उभी राहणार राहीबाईंची देशी बियाणं बँक

First published: January 14, 2019, 5:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading