मराठी बातम्या /बातम्या /देश /

India@75 : 75 वर्षांपूर्वी जुनी दिल्ली एका रात्रीत कशी झाली रिकामी? संस्थानिकांनी ऐनवेळी का बदलली भूमिका?

India@75 : 75 वर्षांपूर्वी जुनी दिल्ली एका रात्रीत कशी झाली रिकामी? संस्थानिकांनी ऐनवेळी का बदलली भूमिका?

15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी दोन शतकांहून अधिक काळ राज्य केल्यानंतर हा देश स्वतंत्र केला. मात्र, स्वातंत्र्यापूर्वी देशात सर्व प्रकारची आव्हाने उभी राहिली.

15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी दोन शतकांहून अधिक काळ राज्य केल्यानंतर हा देश स्वतंत्र केला. मात्र, स्वातंत्र्यापूर्वी देशात सर्व प्रकारची आव्हाने उभी राहिली.

15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी दोन शतकांहून अधिक काळ राज्य केल्यानंतर हा देश स्वतंत्र केला. मात्र, स्वातंत्र्यापूर्वी देशात सर्व प्रकारची आव्हाने उभी राहिली.

  मुंबई, 13 ऑगस्ट : देशाचा 75 स्वातंत्र्यदिन दोन दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने आपण इतिहासाच्या पानात दडलेल्या घटनांवर प्रकाश टाकत आहोत. ही घटना स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरची. दोन दिवसांनी देश 200 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होणार होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. पण, या दरम्यान अनेक घटना अतिशय वेगाने घडत होत्या. उत्तर भारतातून मुस्लिम मोठ्या संख्येने पाकिस्तानात जात होते. सुमारे 9 लाख लोकसंख्या असलेल्या जुन्या दिल्लीने तिची एक तृतीयांश लोकसंख्या गमावली होती. स्वातंत्र्याच्या दोन दिवस आधी भारताने सोव्हिएत युनियनशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सोव्हिएत युनियनचा प्रमुख स्टॅलिन होता. भारताबद्दल त्यांचे अनेक गैरसमज होते. त्यांना वाटले की भारताला स्वातंत्र्य मिळत असले तरी त्यानंतर तो ब्रिटनचा चेला राहील. याशिवाय स्टॅलिनच्या मनात या स्वातंत्र्याविषयी अनेक गैरसमज होते. ज्याला कोणताही आधार नव्हता. विजय लक्ष्मी पंडित यांना मॉस्कोला पाठवलं भारताने स्वातंत्र्यानंतर विजया लक्ष्मी पंडित यांना सोव्हिएत युनियनमध्ये पहिले राजदूत म्हणून पाठवले. कदाचित त्यामुळेच स्टॅलिनने त्यांना भेटण्यात रस दाखवला नाही. इतकेच नाही तर भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याच्या निर्णयावरही सोव्हिएत संघाने विशेष उत्साह दाखवला नाही. त्रिपुराच्या विलीनीकरणाच्या पत्रावर स्वाक्षरी त्रिपुरा हे प्रदीर्घ काळ प्रिंसेस स्टेट होते. 13 ऑगस्ट 1947 रोजी त्रिपुराची राणी कांचनप्रभा देवी यांनी इंस्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशनवर (Instrument of Accession) स्वाक्षरी केली. राणीची इच्छा होती की तिची स्वायत्तता राज्यात राहावी आणि राज्याचा लगाम देखील त्यांच्याकडेच असावा. त्यांनी अनेक अटींसह भारतीय संघराज्यात येण्याचे मान्य केले. त्रिपुराचे राजा वीर विक्रम किशोर देवबर्मन यांचे मे 1947 मध्ये निधन झाले. त्यावेळी त्यांचा मुलगा किरीट विक्रम किशोर हा अल्पवयीन होता, त्यामुळे महाराणी कांचन प्रभा देवी या राज्याच्या प्रमुख होत्या. मात्र, या निर्णयाला राज्यात विरोध झाला. येत्या काही महिन्यांत अशा अनेक घटना राज्यात घडत राहिल्या. नंतर 09 सप्टेंबर 1949 रोजी, राणीने शेवटी इन्स्ट्रुमेंट ऑफ अॅक्सेसनला सहमती दर्शविली, जी 15 ऑक्टोबर रोजी लागू झाली. त्यानंतर त्रिपुरा हा केंद्रशासित प्रदेश बनला. हरिलाल हे पहिले सरन्यायाधीश हरिलाल जेकीसुदास कानिया हे फेडरल कोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांना भारताचे पहिले सरन्यायाधीश बनवण्यात आले. यानंतर, भारत प्रजासत्ताक देश बनल्यानंतर, 1950 मध्ये, कानिया यांना सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले. ते या पदावर दीड वर्षांहून अधिक काळ राहिले. त्यांच्या कार्यकाळाच्या मधेच त्यांचे निधन झाले.

  राष्ट्रध्वज फाटल्यास किंवा जुना झाल्यास काय करावं? कागदी झेंड्यासाठी नियम काय?

  भोपाळचा नवाब म्हणाला की तो स्वतंत्र राहील त्याचवेळी भोपाळचे नवाब हमीदुल्ला खान यांनी आपले संस्थान स्वतंत्र ठेवावे असे स्पष्टपणे सांगितले. भारतीय संघराज्यात सामील होणार नाही. अशीच भूमिका लखनौमध्ये अवधच्या नवाबा घेतली. लखनौमध्ये 90 वर्षांपासून रेसिडेन्सीमध्ये फडकत असलेला युनियन जॅक रात्री उतरवण्यात आला. लखनौमध्ये एक विचित्र घटना घडली. नवाब वाजिद अली शाह यांचा पणतू युसूफ अली मिर्झा पहिल्यांदाच शहरात आला होता. त्याला पाहण्यासाठी हजारो लोक जमले होते. 15 ऑगस्टनंतर अवध स्वतंत्र होईल आणि मिर्झा त्याचा नवाब असेल अशी घोषणा संध्याकाळी करण्यात आली. तर दुसरीकडे हैदराबादच्या निजामाने आपले राज्य स्वतंत्र राहील अशी घोषणा केली. लाहोरमध्ये दंगलीस सुरुवात 13 ऑगस्ट 1947 ला लाहोरची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. सगळीकडे जाळपोळ, तोडफोड, लूटमार, बॉम्बस्फोट, हत्याकांड आणि आरडाओरडा सुरू होता. अशीच हृदयद्रावक परिस्थिती पंजाबच्या इतर भागात होती. कायदा आणि प्रशासनाचे राज्य संपले. कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी ब्रिटीश अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती आता उरली नव्हती. ते अनिच्छेने काम करताना दिसत होते. ब्रिटीश सैन्य आणि पोलीस यांच्यातही गोंधळ उडाला. या सर्वांना आता लंडनला परतायचे होते. अमृतसरमध्ये पोलिसांना गोळीबार करावा लागला. पंजाबमध्ये प्रेस सेन्सॉरशिप लागू करण्यात आली. गांधीजींच्या कलकत्त्यात वास्तव्याने, तेथील परिस्थिती वेगाने पूर्वपदावर येऊ लागली.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Independence day

  पुढील बातम्या