Home /News /national /

शिवसेना कोणाची आज ठरणार? शिंदे-फडणवीस सरकारचं धक्कातंत्र, राज्यात पुन्हा कोसळधार TOP बातम्या

शिवसेना कोणाची आज ठरणार? शिंदे-फडणवीस सरकारचं धक्कातंत्र, राज्यात पुन्हा कोसळधार TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 4 ऑगस्ट : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला आणि आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केला होता. त्यामुळे शिवसेना कुणाची? असा पेच निर्माण झाला होता. या वादावर आज महत्त्वाची सुनावणी सर्वोच्च पार पडणार आहे. सत्तेत आल्यानंतर शिंदे गटाने पुन्हा एकदा प्रभाग रचनेचा निर्णय बदलला आहे. याचा ठाकरे गटाला मोठा फटका बसणार आहे. पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पावासाच अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे, गुरूवारी पहिला सामना शिवसेनेमध्ये (Shivsena) बंडखोरी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. मुख्य म्हणजे या निवडणुकीत ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे (Eknath Shinde) यांच्यामध्ये सामना बघायला मिळणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये उद्या म्हणजेच गुरूवारी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. 'शिंदे' सरकारच्या त्या निर्णयाने काँग्रेस खूश एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) त्यांचं होम ग्राऊंड असलेल्या मुंबईमध्येच धक्का दिला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election) महाविकासआघाडी सरकारने घेतलेला निर्णय रद्द करत पुन्हा एकदा 2017 प्रमाणेच 227 वॉर्डांची रचना ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने मुंबई तसंच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येतही सुधारणा केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शिंदे-फडणवीस सरकारचं धक्कातंत्र शिंदे-फडणवीस सरकारने आज महाविकास आघाडीला खूप मोठा धक्का देणारा निर्णय घेतला आहे. राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. राज्यातील अनेक मोठ्या शहरांच्या महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका आहेत, असं मानलं जातं. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज्यात पुन्हा कोसळधार, हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांचा इशारा राज्यात यंदा जुलै महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कोकण, मध्यमहाराष्ट्र, विदर्भात पावसाने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. त्यात गेल्या काही दिवसात पावसाने उघडीप घेतली. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र, हवामान खात्याने आणखी एक इशारा दिला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. उद्धव ठाकरेंचं शेवटचं अस्त्र बाहेर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना (Shivsena) अडचणीत सापडली आहे. शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का दिला, ज्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं. आमदारांपाठोपाठ शिंदेंकडे शिवसेनेचे 19 पैकी 12 खासदारही गेले. आमदार-खासदारांनंतर शिवसेनेचे पदाधिकारीही शिंदेंकडे जात आहेत, त्यामुळे ठाकरे घराणं त्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. निवडणुकीपूर्वी मोफत घोषणांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध पक्षांकडून देण्यात येणाऱ्या मोफत योजनांच्या आश्वासनाबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिक दाखल करण्यात आली आहे. या जनहित याचिकांवर संसदेत चर्चा व्हावी, या सूचनेवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. चिनीचा उद्दामपणा 2 महिलांनी उतरवला! सध्या तैवान देशावरुन चीन आणि अमेरिका हे दोन बलाढ्य देश आमनेसामने आले आहेत. नुकतीच अमेरिकन काँग्रेसच्या (संसद) कनिष्ठ सभागृहाच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग वेन यांची भेट घेतली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. 'बॉयकॉट लाल सिंग चड्ढा' मागचा मास्टरमाइंड खुद्द आमिरच आमिर खान तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या आमिर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. पण आता या चित्रपटामुळे नवीनच वाद निर्माण झाला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या