News18 Lokmat

मोदींवर लोकांचा भरोसा हाय! म्हणतंय फोर्ब्स मॅगझिन

मोदी सरकारवर देशातल्या 73 टक्के लोकांचा भरवसा आहे. प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या फोर्ब्स मॅगझिननं वेबसाइटवर एक यादी प्रसिद्ध केलीय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2017 01:24 PM IST

मोदींवर लोकांचा भरोसा हाय! म्हणतंय फोर्ब्स मॅगझिन

14 जुलै : जगातलं सर्वात भरवशाचं सरकार कोणतं असेल तर ते आहे मोदी सरकार. मोदी सरकारवर देशातल्या 73 टक्के लोकांचा भरवसा आहे. प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या फोर्ब्स मॅगझिननं वेबसाइटवर एक यादी प्रसिद्ध केलीय. जनतेला सरकारवर असलेल्या भरवशाच्या बाबतीत यादीमध्ये भारताला अव्वल स्थान देण्यात आलंय.

ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटकडून जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये लोकशाही व्यवस्था असलेल्या 34 देशांची नावं देण्यात आलीय. त्यात सरकारबद्दल असलेल्या विश्वासाचं सर्व्हेक्षण करण्यात आलं. त्यात मोदी सरकरानं पहिला नंबर पटकावलाय.

भारतापाठोपाठ कॅनडाचा नंबर आहे. रशिया तिसऱ्या स्थानी तर अमेरिकेचा नंबर खूपच खाली आहे. ट्रम्प सरकारवर केवळ 30 टक्के लोकांचा विश्वास असल्याचं दिसून आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2017 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...