Independence Day 2018: २०१३ सारखं काम करत राहिलो तर १०० वर्ष लागतील, मोदींनी भाजप- काँग्रेस सरकारची केली तुलना

Independence Day 2018: २०१३ सारखं काम करत राहिलो तर १०० वर्ष लागतील, मोदींनी भाजप- काँग्रेस सरकारची केली तुलना

मोदी सरकारचे हे शेवटचे पाचवे वर्ष असल्यामुळे शेवटच्या स्वातंत्र्यदिनावेळी मोदींनी भाजप सरकार आणि यूपीए सरकारच्या कामकाजाची तुलना केली

  • Share this:

नवी दिल्ली, १५ ऑगस्ट- आज भारत ७२ वा स्वांतत्र्यदिवस अभिमानाने सांजरा करत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी ध्वजारोहण आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणम करण्यात आले. ध्वजारोहणनंतर मोदींनी देशाला संबोधित केले. मोदी सरकारचे हे शेवटचे पाचवे वर्ष असल्यामुळे शेवटच्या स्वातंत्र्यदिनावेळी मोदींनी भाजप सरकार आणि यूपीए सरकारच्या कामकाजाची तुलना केली.

लाल किल्यावर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. मोदींनी भाषणाची सुरूवात चंद्रपूर येथील आदिवासी मुलांचे कौतुक करत केले. चंद्रपूर येथील मुलांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकवून देशाची शान वाढवली आहे, या मुलांचा देशाला अभिमान आहे असे मोदी म्हणाले. तसेच या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना मोदींनी नमन केले.

२०१३ च्या वेगाने जर काम करत राहिलो असतो तर घराघरात गॅस सिलिंडर पोहोचवायला तसेच घराघरात शौचालयल बांधायला आणखी १०० वर्ष लागली असती, असे सांगत मोदींनी भाजप सरकार आणि काँग्रेस सरकारच्या कामाची तुलना केली. जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचे नाव नोंदवले गेले आहे, याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. पूर्व ईशान्य भारतात विकासाची कामं मोठ्या प्रमाणात होत असून भारत उत्तरोत्तर प्रगती करत आहे. एकीकडे आपण जमीनीवर प्रगती करत आहे तर दुसरीकडे भारताने १०० हून अधिक उपग्रह अंतराळात सोडले आहेत. आगामी वर्षात अंतराळात मानवाला अंतराळात पाठवणारा भारत चौथा देश ठरणार आहे.

देशातील १३ कोटी लोकांना मुद्रा कर्ज देण्यात आले असून यातील ४ कोटी लोकांनी पहिल्यांदाच कर्ज घेतले आहे. यातून देशातील बदल दिसून येतो. तसेच २५ सप्टेंबरपासून पंतप्रधान आरोग्य अभियानाला सुरुवात होईल. देशातील गरीब जनतेला चांगल्या आरोग्य सेवा मिळणे ही काळाची गरज आहे. येत्या काळात जम्मू- काश्मिरमधील नागरिकांमध्ये अमुलाग्र बदल होतील. जम्मू- काश्मिरमध्ये आम्ही गोळ्या दाखवून नाही तर गळाभेट करुन पुढे जाऊ इच्छितो. येत्या काळात जम्मू- काश्मिरमध्येही इतर राज्यांप्रमाणे पंचायत आणि महानगरपालिका निवडणूका होतील यासाठी सरकार कार्यरत आहे.

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचाही मोदी यांनी या भाषणात समाचार घेतला. एकीकडे महिला वेगवेगळ्या क्षेत्रात भारताचे नाव मोठं करत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारामुळे अख्खा भारत दुःखात आहे. बलात्कार पीडितेला जो त्रास होतो तो मी समजू शकतो. तेवढ्याच वेदना संपूर्ण भारतालाही होतात. बलाक्तारी नराधमांना कोणतीही माफी न देता त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन मोदी यांनी दिलं. तसेच तिहेरी तलाकावरही लवकरात लवकर कायदा आणून मुस्लिम महिलांना योग्य तो न्याय दिला जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2018 09:22 AM IST

ताज्या बातम्या