Home /News /national /

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 700 कोटी मंजूर, केंद्राकडून मदतीची घोषणा

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 700 कोटी मंजूर, केंद्राकडून मदतीची घोषणा

केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 700 कोटी मंजूर केले असल्याची माहिती दिली केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर (Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी दिली.

    मुंबई, 27 जुलै : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी (maharashtra flood) झाल्यामुळे शेतकऱ्यांचे (farmers) प्रचंड नुकसान झाले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे.  केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 700 कोटी मंजूर केले असल्याची माहिती दिली केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी दिली. राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका हा राज्यातील शेतीलाही बसला आहे. पुराचे शेतात घुसल्याने प्रवाहाच्या वेगात ही पिकेही वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ..तर झाला असता सैफ अली खानचा हाफ मर्डर; करीना कपूर मारणार होती चाकू त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून 700 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती दिली आहे. पूरग्रस्तांसाठी उद्या विशेष पॅकेजच्या घोषणेची शक्यता तर, दुसरीकडे, उद्या बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. पूरग्रस्तांच्या प्रश्नामुळे ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीत विशेष पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. ही बैठक प्रदीर्घ असणार आहे. दुपारी साडेबारा वाजता सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होणार आहे. या बैठकीत नुकसानीच सादरीकरण होणार आहे. प्रत्येक विभागाकडून नुकसानीची माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर आपत्तीग्रस्त भागासाठी विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. आजीला सांगून स्नेहा किचनमध्ये गेली अन् परत आलीच नाही, देहूरोडमधील दुर्दैवी घटना दरम्यान, राज्यातील 8 जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी  सुमारे 8 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे असा प्राथमिक अंदाज राज्य सरकारने नुकताच वर्तवला आहे. यात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली , कोल्हापूर आणि विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांचा  समावेश आहे. पिकांची नुकसान भरपाई, रस्ते, वाहून गेलेले पूल बांधणी, कोलमडलेली वीज यंत्रणा उभी करणे, दरडी कोसळलेल्या गावांचं पुनर्वसन, लोकांना मदत यांचा यात समावेश आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या