भुवनेश्वर, 16 जून : ओदिशामधील एक धक्कादायक फोटो समोर आला आहे. वयाची सत्तरी गाठलेली एक महिला आपल्या 100 वर्षांच्या आईला खाटेसह खेचून बँकेत घेऊन जात असल्याचे हे वृत्त आहे.
हा फोटो चिंता वाढवणारा आहे. बँकेतून पेन्शनची रक्कम काढण्यासाठी बँकेने खातेधारकाला आणण्यास सांगितलं. अशा परिस्थितीत महिलेकडे कोणताच पर्याय नव्हता. शेवटी महिला खाटेवर झोपलेल्या आपल्या आईला खाटेसह बँकेत घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होती. दोघेही वयोवृद्द असल्याने 70 वर्षीय महिलेला आपल्या आईला खाटेसह खेचणे जड जात आहे.
Odisha: In a video that surfaced recently, a woman was seen dragging her centenarian mother on a cot, to a bank in Nuapada district to withdraw her pension money allegedly after the bank asked for physical verification. pic.twitter.com/XPs55ElINA
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खाट खेचणाऱ्या महिलेचं नाव पुंजिमती देई असं आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार 70 वर्षीय पुंजिमती आपल्या 100 वर्षीय आईच्या जनधन खात्यातून 1500 रुपये काढण्यासाठी गेल्या होत्या. मात्र बँक कर्मचाऱ्याने खातेधारकाला आणण्यास सांगितले. शेवटी पुंजिमती आपल्या आईला खाटेसह ओढत घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागली. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर तत्सम अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.