Home /News /national /

पत्नीच्या विरहात 70 वर्षीय वृद्धाचा धक्कादायक निर्णय, कागदावर लिहलं, मला तुझी..

पत्नीच्या विरहात 70 वर्षीय वृद्धाचा धक्कादायक निर्णय, कागदावर लिहलं, मला तुझी..

70 वर्षीय वृद्ध नारायण सिंह हे रुपवास पोलीस स्टेशन हद्दीतील वहरावली गावचे रहिवासी होते.

    भरतपूर, 6 जुलै : राजस्थान राज्यातील भरतपूर (Bharatpur) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. भरतपूरमध्ये एका 70 वर्षीय व्यक्तीने एका झाडाला लटकून गळफास घेतला. 70 वर्षीय आत्महत्या (Suicide) केलेल्या व्यक्तीसोबत सुसाईड नोटही (Suicide note) मिळाली आहे. त्यामध्ये जे लिहिले आहे, ते वाचल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. वृद्ध व्यक्तीने लिहिले आहे की, त्यांना त्यांच्या दिवंगत पत्नीची आठवण येत होती. त्यामुळेच ते आत्महत्या करत आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण - 70 वर्षीय वृद्ध नारायण सिंह हे रुपवास पोलीस स्टेशन हद्दीतील वहरावली गावचे रहिवासी होते. त्यांच्या पत्नी भगवान देई यांचे गेल्या वर्षी निधन झाले. पत्नीच्या मृत्यूनंतर नारायण निराशेत जगू लागले होते. त्यांना त्याच्या पत्नीची आठवण यायची. पत्नीच्या वियोगाने नारायण इतका दुखावला होते की त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. यामुळे बुधवारी त्यांनी गावाजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी नातवालाही फोन केला होता. मात्र, काही वेळाने त्यांच्या मृत्यूची बातमी आली. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी सांगितले की, मृताच्या जवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘सर्वांना राम राम, मी आत्महत्या करणार आहे, याचा कुणाशीही संबंध नाही. मी आत्महत्या करत आहे कारण मला माझ्या पत्नीची आठवण येत आहे, ’ असे लिहिले आहे. हेही वाचा - लग्नात वरमुलगा समोर आल्यावर वधूला बसला धक्का, खोलीत जाऊन उचललं टोकाचं पाऊल मथुरा गेट भरतपूरचे स्टेशन प्रभारी रामनाथ गुर्जर यांनी सांगितले की, मृत नारायण सिंह हे 20 वर्षांपासून जिल्हा रुग्णालयाजवळ असलेल्या धर्मशाळेत चौकीदार म्हणून काम करत होते. त्यांनी धर्मशाळेजवळील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्याला दोन मुले असून त्यांची लग्न झाली आहे. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Rajasthan, Suicide

    पुढील बातम्या