प्रेमसंबंधाची गावभर चर्चा, आजी-आजोबांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

प्रेमसंबंधाची गावभर चर्चा, आजी-आजोबांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

कथित प्रेमसंबंधातून 70 वर्षांच्या आजोबांनी आणि 50 वर्षीय महिलेनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

लखनौ, 12 नोव्हेंबर : प्रेम आंधळं असतं असं आपल्याकडे म्हणतात. याचीच पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. कथित प्रेमसंबंधातून उत्तर प्रदेशात एका 70 वर्षांच्या आजोबांनी आणि 50 वर्षीय महिलेनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर 70 वर्षीय आजोबांची प्रकृती गंभीर आहे.

उत्तर प्रदेशातील जालौन जिल्हातील 70 वर्षांच्या आजोबांचे गावातील 50 वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध होते. आशाराम असं या 70 वर्षीय आजोबांचं नाव असल्याची माहिती आहे. या प्रेमसंबंधाची संपूर्ण गावात चर्चा होती.

आशाराम हे रविवारी संबंधित महिलेच्या घरी पोहोचले आणि दोघांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्या 50 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर आशाराम हे जागेवर तडफू लागले.

स्थानिकांनी आशाराम यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकूण घराकडे धाव घेतली. त्यानंतर आशाराम यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एका आगळ्या-वेगळ्या प्रेमाबाबतीत समोर आलेल्या या घटनेची जिल्हात जोरदार चर्चा सुरू आहे. लोकांकडून या प्रेमसंबंधाबाबत उलटसुलट प्रतिक्रिया समोर येत आहेत.

दरम्यान, या दोघांनी नेमका आताच आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

VIDEO: राखीचा डान्स पाहून विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून आपटलं!

First published: November 12, 2018, 2:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading