2019मध्ये नोकऱ्या देणाऱ्या सरकारचे ‘अच्छे दिन’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता पाहायाला मिळत आहे. यावेळी तरूणांच्या हातात सत्तेच्या चाव्या आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण, पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरूणांची संख्या जवळपास 13 कोटी आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2019 05:42 PM IST

2019मध्ये नोकऱ्या देणाऱ्या सरकारचे ‘अच्छे दिन’

लोकसभा निवडणुकीमध्ये आश्वासनांची खैरात होईल. तरूण, महिला, जात या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आश्वासनं दिली जातील. पण, तरूणांच्या मनात काय आहे याचा विचार देखील यावेळी राजकीय पक्षांना करावा लागणार आहे.

देशात 130 मिलियन तरूण अर्थात १३ कोटी तरूण पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षांचा विचार देखील सरकारला करावा लागणार आहे. त्यांना आगामी सरकारकडून नेमकं काय अपेक्षित आहे. याचा देखील विचार करणं क्रमप्राप्त आहे.

पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरूणांपैकी जवळपास 70 टक्के तरूणांनी नोकरी देणारं सरकार हवं असं मत नोंदवलं आहे. Firstpost आणि YouGov Indiaनं केलेल्या सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे. 18 ते 21 वयोगटातील तरूणांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला.

Loading...

72 टक्के महिलांनी देखील नोकरी देणाऱ्या सरकारच्या पारड्यात आपलं मत टाकलं आहे. तर, 79 टक्के महिलांनी महिला सुरक्षेला प्राधान्य देणारं सरकार हवं असं मत नोंदवलं आहे.

2014 साली लोकसभा निवडणुकीमध्ये 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन भाजप सरकारनं दिलं होते. पण, प्रत्यक्षात मात्र नोकरी देण्याच्या आश्वासनांमध्ये सरकार अपयशी ठरल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. त्यामुळे विद्यमान सरकारला तरूणांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो.

काही दिवसांपूर्वी एनएसएसओचा रिपोर्ट लिक झाल्यानं सरकारची मोठी गोची झाली. या रिपोर्टनुसार मागील 45 वर्षाच्या तुलनेत 2017 – 18 साली बेरोजगारांचं प्रमाण हे 6.1 टक्क्यानं वाढलं आहे. सरकारनं मात्र हा रिपोर्ट जारी केलेला नाही. त्यावरून सरकारला बरीच सारवासारव देखील करावी लागली होती.

काही दिवसांपूर्वी एनएसएसओचा रिपोर्ट लिक झाल्यानं सरकारची मोठी गोची झाली होती. या रिपोर्टनुसार मागील 45 वर्षाच्या तुलनेत 2017 – 18 साली बेरोजगारांचं प्रमाण हे 6.1 टक्क्यानं वाढलं आहे. सरकारनं मात्र हा रिपोर्ट जारी केलेला नाही. त्यावरून सरकारला बरीच सारवासारव देखील करावी लागली होती.

शिक्षणाचा उंचावलेला स्तर, भ्रष्टाचार निर्मुलन, जातीयवाद, लोकप्रिय घोषणा, अल्पसंख्यांकांचे हक्क आणि लैंगिक ओळखीचा हक्क इत्यादी मागण्या देखील तरूणांकडून करण्यात आल्या.

शिक्षणाचा उंचावलेला स्तर, भ्रष्टाचार, जातीयवाद, लोकप्रिय घोषणा, अल्पसंख्यांकांचे हक्क आणि लैंगिक ओळखीचा हक्क इत्यादी मागण्या देखील तरूणांकडून करण्यात आल्या.

57 टक्के तरूणांनी आणि 44 टक्के महिलांनी राजकारणात रस असल्याचं मत नोंदवलं. त्यामुळं आश्नासनांची खैरात करताना राजकीय पक्षांना जरा दमानं घ्यावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2019 05:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...